आता हाईकवरुन पाठवा इंटरनेटशिवाय मेसेज

hike
नवी दिल्ली : स्मार्टफोनवाल्यांचे हल्ली इंटरनेटशिवाय पान देखील हलत नाही. त्या स्मार्टफोनचा नेट नसेल तर वापर शून्य असून मोबाईल डेटा, वायफाय इन्स्टंट मेसेजिंग चॅटसाठी गरजेचे असते. मात्र हाईक मेसेंजर अॅपवरुन इंटरनेटशिवाय तुम्ही मेसेज पाठवू शकणार आहात.

काही दिवसांपूर्वी हाईक डायरेक्ट हे नवे फीचर इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म हाईकने लाँच केले. यात इंटरनेट कनेक्शनशिवाय मेसेज करणे शक्य होणार आहे. या फीचरचा वापर करुन तुम्ही वायफाय अथवा मोबाईल डाटा सुरु नसतानाही तुम्ही तुमच्या मित्रांना मेसेज करु शकता. तुम्ही यात फोटोज, स्टिकर्स, फाईल्सही पाठवू शकता. ७० एमबीपर्यंतच्या फाईल्स तुम्ही १० सेकंदात पाठवू शकता. दोन वर्षांपूर्वी व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी हाईक हे अॅप स्मार्टफोनवर दाखल झाले. या अॅपचे ७० मिलियनहून अधिक यूजर्स झाले आहेत.

Leave a Comment