मॅकलॅरिनची वेगवान ६७५ एलटी स्पायडर स्पोर्ट्सकार

spider
लग्झरी स्पोर्टस कार बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मॅकलॅरिनने त्यांची नवी सुपरकार ६७५ एलटी स्पायडर प्रथमच जगासमोर आणली आहे. या मॉडेलची फक्त ५०० युनिट कंपनी बनविणार आहे. मात्र गाडीची किंमत जाहीर केली गेलेली नाही.

या कारसाठी ३७९९ सीसी ट्विन टर्बो बी ८ इंजिन सेव्हन स्पीड सिक्वेन्शिअल शिफ्ट गिअरबॉक्सह दले गेले आहे. स्पायडर ही सर्वात वेगवान कन्व्हर्टिबल सुपरकार असल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे. ही कार ० ते १०० किमीचा स्पीड अवघ्या २.९ सेकंदात घेते. कारचा टॉप स्पीड आहे ताशी ३२६ किमी. कारला १० स्पोक अलॉय व्हील्स दिली गेली आहेत.