गोएअरची खास ख्रिसमस ऑफर: ६०३ रुपयातकरा विमान प्रवास

go-air
मुंबई: प्रवाशांसाठी खास अशी ऑफर गो एअर या विमान कंपनीने आणली असून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर गोएअरने नव्या ऑफरची घोषणा केली आहे.

या ऑफरनुसार विमान प्रवास भाडे ६०३ रुपये (फक्त बेस फेअर आणि इंधन चार्ज) आहे. फक्त ८ डिसेंबरपर्यंतच ही ऑफर असून तुम्ही ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत बुकींग करु शकता. तसेच २५ बुकिंगवर एक मोफत तिकीट मिळण्याची संधी आहे. यावर्षी अनेक ऑफर गोएअरने आणल्या होत्या. मागील महिन्यातही तीन प्रमोशनल ऑफर देण्यात आल्या होत्या. यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान देशांतर्गत विमान प्रवाशांच्या संख्येत २० टक्क्यांची वाढ होऊन ६६०.६० लाख झाली आहे.

Leave a Comment