आयक्यू टेस्टमध्ये भारतीय वंशाची अनुष्का अव्वल

anushka-biyon
लंडन : महान शास्त्रज्ञ आईन्स्टाईन आणि हॉकिंगपेक्षाही भारतीय वंशाची अनुष्का बियॉन ही मुलगी हुशार आहे. नुकत्याच झालेल्या मेनसा आयक्यू टेस्टमध्ये लंडनची रहिवासी अनुष्काने १६२ गुण मिळवले. यासह ती सर्वात बुद्धिमान लोकांच्या यादीत सामील झाली आहे.

आयटी कन्सल्टंट अनुष्काचे वडील विनय जोसेफ हे असून ते केरळचे राहणारे होते. मुलीच्या या अद्भुत यशाबाबत आनंद व्यक्त करताना जोसेफ म्हणाले, माझी मुलगी हुशार आहे याची कल्पना होतीच मात्र इतकी जास्त हुशार असेल याचा अंदाज नव्हता. ११ वर्षाच्या अनुष्काला पुस्तके वाचण्याची प्रचंड आवड आहे. तसेच तिची स्मरणशक्तीही चांगली असल्याचे जोसेफ यांनी यावेळी सांगितले.