जगभरातील आणखी काही वंडर्स

[nextpage title=”जगभरातील आणखी कांही वंडर्स”]
collarge
जगात मानव प्रथम कधी आला आणि त्याची उत्तरोत्तर कशी प्रगती होत गेली हे दर्शविणारे अनेक पुरावे सापडतात. मात्र मानवाने प्राचीन काळापासून वंडर्स म्हणाव्या अशा कलाकृती, वास्तू निर्माण केल्या ती त्याची खरी ओळख. ही आश्वर्ये जगातील आश्चर्ये म्हणून ओळखली जातात. निसर्गाचा चमत्कार दाखवितात ती नैसर्गिक अद्भूते आणि मानवाचा चमत्कार दाखवितात ती आश्चर्ये. गिझाचे पिरॅमिड, जॉर्डन पेट्रा, रोममधले कलोसियम, आग्रा ताजमहाल, चीनची भिंत अशी ही यादी आजपर्यंत सात आश्चर्यांवर मर्यादित होती. मात्र अजूनही अशी अनेक आश्चर्ये आहेत ज्याची फारशी माहिती आपल्याला नाही.

जगातील सात आश्चर्ये पर्यटकांसाठी नेहमीच गर्दीने फुललेली ठिकाणे राहिली आहेत आणि ती तशी राहायलाही हवीत. प्रत्येक पर्यटकाने शक्य असेल तेव्हा ही आश्चर्ये पाहून थक्क व्हायला हवेच पण सध्या गर्दी नको आणि आश्चर्यकारक गोष्टी तर पहायच्या आहेत अशा पर्यटकांना आणकी काही आश्चर्यांची करून दिलेली ही ओळख

1-Chocolate-Hills,-Philippi
1)चॉकलेट हिल्स
फिलीपिन्सच्या विसयास भागात या चॉकलेटच्या टेकड्या आहेत. हा निसर्गाचा चमत्कार आहे. एकसारख्या आकाराच्या या टेकड्या मोल्ड मध्ये घातल्यासारख्या तर आहेतच पण गवताने पूर्ण झाकलेल्या आहेत. उन्हाळ्यात हे गवत चॉकलेटच्या रंगात बदलते म्हणून यांना चॉकलेट हिल्स असेच नांव आहे. 1776 इंच उंचीच्या या टेकड्या 50 चौरस किमीच्या परिसरात पसरलेल्या आहेत. कार्मेन शहराजवळ या टेकड्या पाहायला मिळतात.[nextpage title=”2)टोरन, पोलंड”]

2-Torun,-Poland
मध्ययुगातील हे शहर अतिशय उत्तम तर्‍हेने जतन केले गेले आहे. पर्यटकांसाठी हे शहर गजबजलेले असते. मुख्य म्हणजे थोर खगोलशास्त्रज्ञ निकोलस कोपर्निकस याची ही जन्मभूमी. या शहरात प्रवेश केला की मध्ययुगीन काळात आल्यासारखे वाटते कारण त्या काळातील प्रचलित इमारती, विटांची बांधकामे अजून फारच चांगली जतन केली गेली आहेत. त्यात चर्चपासून ते टाऊनहॉल व शहराच्या तटबंदीपयर्ंत बांधकामांचा समावेश आहे. पर्यटकांची गर्दी असली तरी मध्ययुगीन शांततेचा अनुभव येथे घेता येतो.[nextpage title=”3)सुसा, इराण”]

3-susa,-iran
इराणमधील सिव्हीलायझेशनच्या खुणा दाखविणार्‍या या शहराला श्रींमत इतिहास आहे.मिडल इस्ट मधील अनेक आंदोलनात या शहराचा सहभाग होता.मात्र या प्राचीन शहराचे उल्लेख बायबलमध्येही अनेकदा येतात. या शहरात बीसीपूर्व 5 व्या शतकांतील कांही अवशेष आजही पाहता येतात. शावून नदीकाठचा आर्देशीर पॅलेस, सुसा सिमेंटरी येथे अनेक प्राचीन वस्तू सापडल्या आहेत. त्यात कबरीतून सिरॅमिकची भांडीही मिळाली आहेत. म्हणजे इतक्या पूर्वीही येथील लोकांना सिरॅमिक पॉटरी माहिती होती.[nextpage title=”4)मेटेओरा, ग्रीस”]

4-Meteora,-Greece
मेटेओरा याचा अर्थ आकाशाचा मध्य. ग्रीस मधील या प्राचीन शहरात सर्वात मोठे मॉनेस्ट्री संकुल आहे. पूर्वी सनातन विचारांच्या लोकांनी या सहा मॉनेस्ट्रीज बांधल्या त्या सँडस्टोन खडकाच्या टोकावर. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांत याची नोंद केली आहे. हे िंठकाण अजूनही पर्यटकांच्या वर्दळीपासून मुक्त आहे.[nextpage title=”5)पोर्ट मेरियन- वेल्स”]

5-Portmeirion,-Wales
इटलीचे लघुरूप पाहायचे असेल तर या ठिकाणाला भेट द्यायला हवी. नॉर्थ वेल्सच्या मधोमध इटालियन आर्किटेक्चरच्या नमुन्याच्या अनेक वास्तू येथे आढळतात. इटालीतील सुंदर बंदरे म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोर्टफिनो किंवा सोरंतोची आठवण येथे होणे अपरिहार्य. मेडिटेरियनची आठवण म्हणून डिझायनर सर क्लो विलियम्स इलिस यांनी ही रोमँटिक व रिलॅक्स करणारी नगरी उभारली. सेंट्रल पिआसा हे येथील मुख्य आकर्षण.[nextpage title=”6)टनेल ऑफ लव्ह- युक्रेन”]

6-Tunnel-of-Love,-Ukraine
युक्रेनच्या जंगलात अगदी आत सुमारे तीन किलोमीटरचा हा गवत आणि झाडींनी पूर्ण आच्छादलेला रेल्वेरोड ट्रॅक टनेल ऑफ लव्ह म्हणून ओळखला जातो. अनेक फोटोंमध्ये तो बॅकड्रॉप म्हणून दिसतोच पण प्रेमी युगलांसाठी ही वाट फारच अनोखी. दाट गर्द झाडीने व्यापलेल्या या टनेलमधून प्रेमी युगलाने एकत्र वाटचाल केली तर त्यांच्या इच्छा पूर्ण होतात असा समज आहे आणि विशेष म्हणजे आजच्या आधुनिक विज्ञानाच्या काळातही इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून या टनेलला भेट देणार्‍यांची संख्या प्रचंड मोठी आहे.[nextpage title=”7)इफेसर तुर्कस्तान”]

7-Ephesus,-Turkey
तुर्कस्तानातील इफेसर हे प्राचीन काळातला सौंदर्यमणी म्हणून प्रख्यात आहे. येथील आयोनिका शोअर, अर्टेमिस मंदिर, जगातल्या सात आश्चर्यातील एक मानले जात असे मात्र युद्धांत ते भंगले आहे. असा समज आहे की व्हर्जिन मेरीने तिच्या आयुष्यातील शेवटची वर्षे या शहरात काढली होती. टेंपल ऑफ हड्रेन व पोलिओ टोंब पाहण्यासारखी स्थळे.[nextpage title=”8)हाँटिंग चपाडा म्हणजे भारलेली विहीर- ब्राझील”]

8-National-Park,-Brazil
डायमेरिना नॅशनल पार्क मधल्या या विहीरीला जरी भारलेली विहीर असे नांव असले तरी ती प्रत्यक्षात विहीर नाही. तर प्रचंड मोठे सरोवर आहे. 100 फुटांपेक्षा खोल सरोवराचे पाणी इतके नितळ आणि स्वच्छ आहे की तळातील खडक, झाडांची खोडे स्पष्ट दिसतात. एका छोट्याशा झरोक्यातून आत येणारा सूर्यप्रकाश येथे चमत्कार घडवितो आणि या पाण्याला गडद निळा प्रकाश देतो. हा प्रकाश परावर्तित होता आणि आपण खरोखरच एखाद्या भारलेल्या ठिकाणी आलो आहोत असा फिल येतो.[nextpage title=”9)पोटाला पॅलेस तिबेट”]

9-Potala-Palace,-Tibet
1645 पासून क्रांतीच्या कचाट्यात सापडलेल्या तिबेट मधील हा पॅलेस 1959 पंर्यंत दलाई लामांचे निवासस्थान होता. ल्हासातील या पॅलेसला जवळच्या पोटालाका पर्वतावरून नांव पडले आहे. येथे दोन चॅनल्स किंवा खासगी पूजास्थाने आहे पैकी एक ध्यानधारणेसाठीची गुहा आहे. बाहेरून हा पॅलेस म्हणजे एखादा किल्ला वाटतो. आत उतरत गेलेल्या भिंंती. सपाट छप्पर, खडकातून वरपर्यंत गेलेल्या पायर्‍या किल्यात आल्याची जाणीव करून देतात. आत दोन उपमहाल आहेत. त्यातील पांढर्‍या रंगाच्या वास्तूत दलाई लामांचे वास्तव्य असते तर लाल रंगाची वास्तू ही प्रार्थना मंदिर आहे. सध्या येथे संग्रहालय आहे.[nextpage title=”10)अयुद्या”]

10-Ayutthaya,-Thailand
थायलंडमधील हे शहर पूर्वीच्या सयाम म्हणजे थायलंडची राजधानी. चाओफाया नदीकाठचे हे नगर त्या काळातही अत्यंत भरभराटीला आलेले होते आणि त्याला व्हेनिस ऑफ द इस्ट म्हणून ओळखले जात असे कारण येथे रस्यांप्रमाणेच अनेक पाणवाटा किंवा कालवे होते आणि त्यातून रहदारी सुरू असे. या प्राचीन शहरात शेकड्यांनी मंदिरे होती त्यांचे भग्नावशेष आजही पाहता येतात. ही मंदिरे पुर्ननिर्माणाचे काम सुरू आहे. हिस्टोरिकल पार्कमध्ये ही मंदिरे आहेत त्यातील थमिकरण वट व वट यानटेन ही मुख्य आहेत.[nextpage title=”11)रेड बीच -पंजिंंग चायना”]

11-Red-Beach,-Panjin,-China
हा खरा किनारा नाही. कारण येथे समुद्र नाही आणि समुद्राची वाळूही नाही. मात्र सुदा नावाच्या समुद्र वेली मुबलक प्रमाणात आहेत. या वेली वसंत ऋतूत वाढतात आणि उन्हाळ्यात हिरव्यागार असलेल्या या वेलींना हिवाळ्यात सुंदर मरून शेड येते. सप्टेंबर ते नोव्हेंबर हा काळ या मरून रंगाच्या वेली पाहण्यासाठीचा उत्तम काळ. त्याच्यावरूनच हे रेड बीच नांव आले आहे.[nextpage title=”12)ट्रान्सफिगरेशन चर्च रशिया”]

12-Transfiguration-Church,-
युनेस्कोने जागतिक वारसा यादीत नोंदय केलेले हे स्थळ लाकडी चर्च आहे. किझी पोगॉस्टमध्ये लेक ओनेगाच्या काठी असलेले हे चर्च प्रथम 1714 साली बांधले गेले मात्र वीज पडून त्यात ते जळाले. त्यानंतर ते पुन्हा बांधले गेले. पूर्ण लाकडातील या बांधकामात कुठेही खिळ्यांचा वापर केलेला नाही. विविध आकाराचे 22 घुमट ्रअसलेले हे चर्च 37 मीटर उंचीचे आहे.[nextpage title=”13) फॉरेस्ट ऑफ नाईव्हज-मादागास्कर”]

13-Forest-of-Knives,-Madaga
सुर्‍या चाकूंचे जंगल वाटावे असा हा परिसर, ज्युरासिक काळातील आहे. हा निसर्गाचा चमत्कार असून येथे चुनखडीचे खडक अशा फॉर्ममध्ये आहेत की ते पाहता टोकदार सुर्‍या चाकूंची आठवण येथे अपरिहार्य आहे. हे नाईव्हज फॉरेस्ट दुरूनच पाहायचे कारण जवळ जाणे अशक्यच. 666 चौरस किलोमीटरच्या परिसरात ते पसरलेले आहे. पण या टोकदार आणि धारदार जंगलामुळेच त्याच्या पलिकडची वनसंपदा, प्राणीसंपदा अनटच्ड राहिली आहे.[nextpage title=”14)बागान”]

14-Bagan,-Myanmar
म्यानमारमधील हे मंदिरांचे शहर. कंबोडियातील अंकोरवट प्रमाणेच हेही प्राचीन शहर आहे. या एकट्या शहरात 10 हजारांहून अधिक बौद्ध मंदिरे आणि पॅगोडा होते. त्यातील आता बरीचशी नष्ट झाली असली तरी अजूनही 2 हजाराहूंन अधिक मंदिरे आणि पॅगोडा येथे आहेत. पर्यटकांना ती पाहता येतात आणि ती पाहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे हॉट एअर बलून. या बलून मधून राईड घेऊन आकाशात विहरताना ही मंदिरे निरखता येतात.

Leave a Comment