१० डिसेंबरला लाँच होणार ‘ऑडी’ची ‘क्यू७’

audi-q7
नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत दाखल होण्यासाठी अलिशान मोटारींची निर्मिती करणा-या जर्मनीच्या जगप्रसिद्ध ‘ऑडी’ची नवी ‘क्यू७’ ही अलिशान मोटार सज्ज झाली असून, या मोटारीचे येत्या १० डिसेंबरला लाँचिंग होणार आहे. लाँचिंगच्यावेळीच क्यू ७ ची किंमतही जाहीर करण्यात येणार आहे.

नाविन्यपूर्ण बदल ऑडी क्यू ७च्या इंटेरियअर आणि एक्सटीरिअरमध्ये करण्यात आले असून, मायलेजमध्येही वाढ करण्यात आली आहे. ही मोटार
ऍल्यूमिनियमच्या वापरामुळे वजनाने आधीच्या मोटारीपेक्षा ३२५ किलोने हलकी झाली आहे. ३.० लिटर वी६ टीडीआय इंजिन नव्या क्यू७मध्ये देण्यात आले असून, ते ३७२ वीएचपी पॉवर आणि ६०० एनएम टॉर्क जनरेट करते. यामध्ये ८स्पीड ऑटोमॅटीक ट्रान्समिशन सिस्टिमचाही समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय हेक्जागोनल सिंगल प्रेम क्रोम ग्रिल, न्यू एरो-शेप्ड डीआरएलएस, जिनॉन हेडलॅम्प, एलईडी किंवा मॅट्रिक्स एलईडी लॅम्प, डेटाईम रनिंग लाइटस्, इंटिग्रेटेड टर्न सिग्नल आदी फिचरचाही क्यू७मध्ये समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment