फेसबुकने सुरु केली ‘लाईव्ह ब्रॉडकास्ट’ सेवा

facebook
नवी दिल्ली : नेहमीच आपल्या युजर्ससाठी फेसबुक नवे फीचर्स घेऊन येत असते. आता ‘लाईव्ह ब्रॉडकास्ट’ सेवा फेसबुकने सुरु केली असून सध्या ही सेवा अमेरिकेतील आयफोन युजर्ससाठी मर्यादित आहे. पण भारतातील फेसबुक युजर्ससाठी ही सेवा लवकरच सुरु केली जाणार आहे. तरीसुद्धा भारतात नक्की कधी ‘लाईव्ह ब्रॉडकास्ट’ सेवा लॉन्च केली जाईल, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

ट्विटरची लाईव्ह ब्रॉडकास्ट सर्व्हिस ‘पेरिस्कोप’ आणि ‘मेराकॅट’ला टक्कर देण्याच्या तयारीत फेसबुक ‘लाईव्ह ब्रॉडकास्ट’ आहे.

या सर्व्हिसमुळे तुम्ही ज्या पेजला किंवा युजरला सबस्क्राईब केले असेल, त्या युजर किंवा पेजची लाईव्ह ब्रॉडकास्ट सेवा सुरु झाल्यानंतर फेसबुकचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ज्यानंतर तुम्ही त्या युजरला लाईव्ह पाहू शकणार आहात.

लाईव्ह ब्रॉडकास्ट सेवेचा एक मोठा फायदा असा की, लाईव्ह ब्रॉडकास्ट संपल्यानंतर तुम्ही पुन्हा संपूर्ण ब्रॉडकास्ट पाहू शकता. ही सेवा सध्या सर्वांना उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. काही सेलिब्रेटी आणि महत्त्वाच्या व्यक्तींसाठीच उपलब्ध करुन देण्याच आली आहे.

Leave a Comment