‘मोटोरोला’चे सादर केले ‘मोटो ३६०’ स्मार्टवॉच

moto-360
नवी दिल्ली : ‘मोटो ३६०’ हे नवीन स्मार्टवॉच स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रातील ‘मोटोरोला’ने लाँच केले आहे. आकर्षक व नाविन्यपूर्ण फिचर्ससह दमदार बॅटरीचा नव्या मोटो ३६०मध्ये समावेश असून १९,९९९ रूपये इतकी या स्मार्टवॉचची किंमत आहे.

भारतात मोटो ३६०चे पाच मॉडेल लाँच करण्यात येत असून तीन मेटल आणि दोन लेदर मॉडेलचा यामध्ये समावेश आहे. पहिल्यांदाच कंपनीने महिलांसाठी दोन मॉडेल लाँच केले असून पुरूषांसाठी कॉग्नेक, ब्लॅकलेदर तथा ब्लॅकमेटल हे मॉडेल आहेत.

स्मार्टफोनला सुद्धा मोटोरोलाचे हे स्मार्टवॉच कनेक्ट करता येते. मोबाईल फोनमध्ये नोटीफिकेशन पाहण्याची सुविधाही यामध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. शिवाय या स्मार्टवॉचमध्ये अनेक हेल्थ आणि फिटनेस ट्रेकर फिचर्सचा समावेश आहे.

Leave a Comment