जानेवारीत लाँच होणार ‘टाटा’ची ‘झिका’

tata
नवी दिल्ली : आपली नवी हॅचबॅक कार ‘झिका’चे फोटो ‘टाटा मोटर्स’ने प्रसिद्ध केले असून यामध्ये झिकाचा लूक अधिक आकर्षक दिसत आहे. येत्या जानेवारीत ही कार लाँच करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. ३.५ लाख ते ४ लाख दरम्यान झिकाची एक्स शोरूम किंमत असू शकते.

टाटा इंडिकासारखाचा लूक असलेल्या झिकाच्या प्रंटला नवीन सिग्नेचर हनी-कॉम्ब ग्रिल बसविण्यात आले आहे. दरम्यान कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिक माहिती झिकाच्या फिचर्सबाबत देण्यात आलेली नाही. साइड प्रोफाईलवरून झिका ‘टाटा झेस्ट’ प्रमाणे दिसते. मात्र, कारच्या पाठीमागचा भाग हा पूर्णपणे नवीन असून, तो टाटाच्या अन्य कोणत्याही मोटारीशी मिळताजुळता नाही. झिकाला ‘एक्सओ’ प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे.

१.० लीटर, ३ सिलेंडर इंजिन झिकामध्ये बसविण्यात आले असून, ते ६३ बीएचपी पॉवर आणि १४० एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच पेट्रोल मॉडेलमध्ये १.२ लीटर रेवोट्रोन इंजिनचा समावेश करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. कंपनीकडून झिकाला मॉडर्न लूक देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.