जगातील महागडे विवाहसोहळे

[nextpage title=”जगातील महागडे विवाहसोहळे”]
collarge
लग्न हे आयुष्यात एकदाच करायचे व त्यामुळे थाटामाटात करायचे हा विचार आता जुना झाला. मुळातच लग्न ही एकदाच करण्याची गोष्ट राहिली नाही. तरीही लग्नासाठी खर्च मात्र वाढतच चालला आहे. यात हौसेचा भाग किती आणि दिखाव्याचा भाग किती हे सांगणे अवघड. त्यातून ही लग्ने सेलिब्रिटींची असतील तर मग पाहायलाच नको. अशाच दहा महागड्या विवाहसोहळ्याची ही माहिती. विशेष म्हणजे कोट्यावधी रूपये खर्च करून छानछोकीने केली गेलेली ही सगळीच लग्ने टिकली असे मात्र झाले नाही.

1-Elizabeth-Taylor-and-Larr
१) एलिझाबेथ टेलर व लॉरी फोर्टेन्स्की
हॉलीवूडची ही अत्यंत सुंदर व लोकप्रिय नायिका. तिने लग्ने करण्याचे जणू रेकॉर्डच केले. तिची आठ लग्ने झाली. त्यातील शेवटचे हे लग्न. नवरदेव तिच्यापेक्षा कितीतरी लहान. मात्र तरीही या लग्नासाठी २.५ दशलक्ष डॉलर्स खर्च केले गेले. १९९१ मध्ये हे लग्न मायकेल जॅक्सनच्या नेदरलँड रँचवर १६० पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडले. यात मायकेल फादर ऑफ द ब्राईड होता. व्हेलेंटिनाकडून २५ हजार डॉलर्सचा वधूवेश भेट म्हणून दिला गेला होता. हे लग्न अवघे पाच वर्षे टिकले. असे सांगतात या लग्नासाठी एडी मर्फी, नॅन्सी रिगन, मॅकॉली कुलीन पाहुणे होते आणि त्यांच्यामागे पडलेले पापाराझी चक्क हेलिकॉप्टरमधून रँचवर घिरट्या घालत होते.[nextpage title=”२)पॉल मकार्ने-हिदर मिल्स”]

2-Paul-McCartney-and-Heathe
या लग्नसाठी आलेला खर्च होता ३ दशलक्ष डॉलर्स. असे सांगतात या लग्नसमारंभाचे फोटो मिळविण्यासाठी टॅब्लॉईड मासिकाने लक्षावधी डॉलर्सची ऑफर त्यांना दिली मात्र पॉल व हिदरने ती फेटाळून लावली. २००२ मध्ये हा विवाह झाला तो खास भारतीय स्टाईलने व तो ही आयर्लंड मध्ये. विवाहाचा मेन्यू शाकाहारी होता त्यानंतर नृत्य व आतशबाजी केली गेली. फुलांची सजावटही नयनमनोहर होती. त्यासाठीच सुमारे दीड लाख डॉलर्स खर्च केले गेले. हॉल भाड्यासाठी ४० हजार डॉलर्स मोजले गेले. यावेळी मॅकर्नेने लिहिलेल्या हीदर हे गाणे गाण्यासाठी रिंगो आणि जॉर्ज हे कलावंत आले होते.[nextpage title=”३)लिसा मिनेल्ली-डेव्हीड जेस्ट”]

3-Liza-Minnelli-and-David-G
३.५ दशलक्ष डॉलर्स खर्चून स्वप्नवत वाटावा असा समारंभ करून झालेले हे लग्न अवघे १६ महिने टिकले. २००२ मध्ये झालेल्या या विवाहसोहळ्यासाठी न्यूयॉर्कचे रिजेंट हॉटेल बुक केले गेले होते आणि लग्नाला ८५० पाहुणे आले होते.[nextpage title=”४)चेल्सा क्लिंटन-मार्क मेझविन्स्की”]

4-Chelsea-Clinton-and-Marc-
५ दशलक्ष डॉलर्स खर्च करून २०१० मध्ये झालेला हा विवाह अ्मेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल व माजी परराष्टमंत्री हिलरी क्लिंटन यांची एकुलती लेक चेल्सासाठी नक्कीच विशेष दिवस होता. या लग्नाला साहजिकच काँग्रेसमनची गर्दी अधिक होती. ४०० पाहुणे या समारंभाला आले होते. २०१२ मध्ये चेल्साच्या घटस्फोटासंबंधी जोरदार अफवा उठल्या मात्र अजून तरी ते दोघे एकत्र नांदत आहेत.[nextpage title=”५)वॅन सनी-कोलिन मॅक्लाघ्लीन”]

5-Wayne-Rooney-and-Coleen-M
८ दशलक्ष डॉलर्स खर्चून झालेला हा विवाह. त्यात वॅन मॅचेस्टर युनायटेड क्लबचा लोकप्रिय फूटबॉल खेळाडू. त्याने २००८ साली त्याची शाळामैत्रीण कोलिन हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. लग्नाला फक्त आठ पाहुणे होते.लग्नाचे फोटो मिळावेत म्हणून एका मासिकाने त्यांना अडीच दशलक्ष डॉलर्स दिले व त्यामुळे या मासिकाचा पत्रकार लग्नाला उपस्थित होता. दोन भागात हे लग्न लागले. म्हणजे पहिला भाग ३३० वर्षे जुन्या व्हिलात पार पडला. हा व्हिला सोळाव्या लुईचा होता. नंतरचा समारंभ रिव्हीएरा रिसॉर्टमध्ये साजरा झाला. हा व्हिलाही १७ व्या शतकातला आहे. प्रायव्हेट जेटमधून कुटुंबिय आले तर वधू लग्झरी याचमधून आली होती.[nextpage title=”६) किम कार्देशियन-ख्रिस हम्पायर”]

6-Kim-Kardashian-and-Kris-H
१० दशलक्ष डॉलर्स- बहुतेक टॉप मासिके आणि मनोरंजन संस्थांनी कव्हरेजसाठी उत्सुकता दाखविलेला हा विवाहसोहळा २०११ त पार पडला. या लग्नाचे थेट प्रसारण करण्यासाठीच हक्क मिळविण्यासाठी संबंधित कंपनीने १८ दशलक्ष डॉलर्स मोजले असे समजते. त्यामुळे या जोडप्याला त्यांचे लग्न तस फुकटातच पडले. मात्र त्यानंतर घटस्फोटासाठी जे वकील नेमले गेले त्यांना त्यांची फी मात्र या जोडप्याने दिलीच नाही. हे लग्न फक्त ७२ दिवस टिकले. म्हणजे वधूची मेंदी उतरण्याआधीच घटस्फोट झाला.[nextpage title=”७) प्रिन्स विलीयम्स-केट मिडलटन”]

7-Prince-William-and-Kate-M
३४ दशलक्ष डॉलर्स खर्च झालेला हा विवाहसोहळा अवघ्या ब्रिटनवासियांसाठी महत्त्वाचा असा होता कारण हा त्यांच्या राजपुत्राचा विवाह होता. गेल्या दशकातले हे बडे रॉयल वेडिंग. २०११ साली वेन्स्टमिन्स्टर अॅबेमध्ये झालेला हा सोहळा टिव्हीवरून जगभरातील २ अब्ज लोकांनी पाहिला. लग्नसमारंभासाठी तीन प्रकारचे पाहुणे होते. १९०० लोक लग्नाला होते, ६०० लोकांना लंच दिले गेले तर ३०० लोकांना डिनरसाठी आमंत्रण होते.[nextpage title=”८)लेडी डायना-प्रिन्स चार्लस”]

8-Lady-Diana-and-Prince-Cha
१९८१ साली झालेले हे लग्न वेडींग ऑफ द सेंच्युरी म्हणून ओळखले जाते. या लग्नासाठी ४८ दशलक्ष डॉलर्स खर्च आला आणि जगभरातील साडेसात कोटी लोकांनी ते टिव्हीवरून पाहिले. या लग्नाला ३५०० पाहुणे होते.सेंट पॉल कॅथड्रेल लंडन मध्ये हा सोहळा झाला तेव्हा वधूला ग्लास कोचमधून नेले गेले व तिला पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा २० लाख लोक उभे होते. लग्नाचा स्वागतसमारंभ बकींगहॅम पॅलेसमध्ये झाला. हे लग्न ११ वर्षे टिकले. डायना व चार्लस १९९२ मध्ये वेगळे झाले आणि त्यांनी १९९६ मध्ये घटस्फोट घेतला.[nextpage title=”९)वनिशा मित्तल-अमित भाटिया”]

9-Vanisha-Mittal-and-Amit-B
२००४ साली झालेला हा विवाहसमारंभ तब्बल ६ दिवस सुरू होता. लग्नासाठी ६० दशलक्ष डॉलर्स खर्च केले गेले. पॅलेस ऑफ व्हर्सेली येथे ताप्तुरता लाकडी आलिशान महाल बनविला गेला होता. जगभरातून आलेल्या १ हजारांवर पाहुण्यांना खासगी जेटने फ्रान्सला आणले गेले. चांदीच्या बॉक्समधून निमंत्रणे दिली गेली ती विमानतिकीट आणि फाईव्ह स्टार हॉटेलमधील खोल्यांच्या बुकींगसोबत. भोजनाची व्यवस्था खास भारतीय शेफनी केली व आतशबाजी केली गेली आयफेल टॉवरवर.[nextpage title=”१०)शेख मोहम्मद बिन झाएद अल नह्यान-प्रिन्सेस सलमा”]

10-Sheikh-Mohammed-bin-Zaye
१९८१ मध्ये झालेला हा विवाहसोहळा अतिखर्चिक स्वरूपाचा होता. या लग्नसाठी १०० दशलक्ष डॉलर्स खर्च केले गेले आणि सात दिवस हा सोहळा सुरू होता. लग्नासाठी २० हजार पाहुणे बसू शकतील असे स्टेडियम बांधले गेले. घोड्यावरून वराची शहरातून वरात निघाली त्यावेळी नागरिकांना जेवण व पैसे भेट म्हणून दिले गेले. वराने महागड्या किमती हिर्‍यामोत्यांनी सजविलेले २० उंट वधूला भेट म्हणून दिले.

Leave a Comment