जगातील दहा सर्वोत्कृष्ट पूल

[nextpage title=”जगातील दहा सर्वोत्कृष्ट पूल”]
collarge
नदी नाले ओढे आणि समुद्र लंघून जायचे तर पूल आवश्यकच. अशा पूल बांधणीसाठी स्ट्रक्चरल अभियांत्रिकीचा वापर फार पूर्वीच्या काळापासून केला जात आहे. दोन ठिकाणे जोडणे, दोन स्थळांतील अंतर कमी करणे आणि जगाच्या दोन संस्कृती जोडण्यास मदत करण्यात या पुलांचा वाटा मोठा असतो. आज आपण जगातील १० प्रसिद्ध पुलांची माहिती करून घेऊ या. हे पूल केवळ दोन ठिकाणे जोडणारे पूल नाहीत तर माणसाचे कौशल्य आणि त्याची बौद्धिक श्रीमंती दाखविणार्‍या खास गोष्टी आहेत.

1-Oliveira-Bridge,-Brazil
१) ओलिव्हेरा ब्रिज
ब्राझीलमध्ये साऊपावलो येथे पिन्हारो नदीवरचा हा पूल जगातला पहिला एक्स शेपचा वायर ब्रिज आहे. ४५० फुटांचा हा केबल ब्रिज २००८ मध्ये उभारून पूर्ण झाला. त्यात दोन स्वतंत्र वळणदार पूल एकमेकांना क्रॉस करतात. तेथे तयार होणार्‍या एक्स अक्षराच्या आकाराला टॉवरच्या सहाय्याने सपोर्ट दिला गेला आहे. साउपावलो जिल्ह्यातील ब्रुकलीन व रिल पार्क या दोन ठिकाणांना हा पूल जोडतो. साऊपावलो हे ६० लाख गाड्या असलेले जगातील गजबजलेल्या शहरातील एक असून आधुनिक शैलीच्या या पुलामुळे तेथील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत झाली आहे.[nextpage title=”२)पर्ल ब्रिज, कोबे”]

2-The-Pearl-Bridge
जगातील सर्वात लांब सस्पेन्शन ब्रिज अशी ओळख असलेला हा पूल १२८३१ फूट लांबीचा आहे. याची उभारणी १९८६ साली सुरू झाली आणि तो १९९८ साली बांधून पूर्ण झाला. या भागात होत असलेले भूकंप आणि समुद्राची अस्थिरता यावर मात करण्यासाठी हा लिंक पूल कोबे आणि इवाना या दरम्यान बांधला गेला. हा पूल ६ पदरी आहे आणि कोबेच्या प्रलयंकारी भूकंपात त्याची चाचणी झाली.[nextpage title=”३) ओरसंड ब्रिज”]

3-The-Oresund-Bridge
स्वीडन आणि डेन्मार्क या दोन देशांना जोडणारा हा समुद्री पूल वाहने आणि रेल्वे अशा दोन्हीसाठी वापरात आहे. २००० साली हा ब्रिज बांधून पूर्ण झाला त्याची एकूण लांबी ८ किमी आहे आणि विशेष म्हणजे सुरवातील केबल ब्रिज असलेला हा पूल शेवटी बोगद्यचे रूप घेतो. स्वीडनच्या माल्मो व डेन्मार्कच्या कोपनहेगनला जोडणारा हा पूल आहे. समुद्रातून तो जेथे बोगद्यात रूपांतरीत होतो तेथे कृत्रिम बेट उभारले गेले आहे. विशेष म्हणजे या पुलामुळे जहाज वाहतूकीला कोणताही अडथळा होत नाही. चार पदरी पुलावरून रेल्वे आणि वाहने दोन्ही जाऊ शकतील अशा लेन्स आहेत. या पुलाला आऊटस्डँडीग स्ट्रक्चर अॅवॉर्ड २००२ मिळाले आहे.[nextpage title=”४)चार्लस ब्रिज”]

4-Charles-Bridge,-Prague
पेराग्वे येथील चौदाव्या शतकातील बांधकाम केलेला हा दगडी पूल गोथिक शैलीतील वास्तूरचनेचा उत्तम नमुना समजला जातो. हा पूल पंधराव्या शतकाच्या सुरवातीला बांधून पूर्ण झाला. पेराग्वेमधील वाताव्हा नदीवर हा पूल असून तो किल्ला आणि दुसर्‍या तटावरील बाकी जुने शहर यांना जोडतो. ६२१ मीटर लांबीचा हा पूल १० मीटर रूंद आहे. त्याला ३ ब्रिज टॉवर्स आहेत. जुन्या गावाकडील टॉवर गोथिक शैलीचा अप्रतिम नमुना असून सध्या हा पूल फक्त पादचार्‍यांसाठी खुला आहे. पूर्वी याच्यावरून ट्राम आणि कार जात असत. पर्यटकांसाठी हे आकर्षणचे मुख्य केंद्र असून या पुलावर कलाकार, संगीतकार आणि विविध कलाकुसरीच्या वस्तू विकणारे विक्रेते रांगेने बसलेले असतात.[nextpage title=”५)मिलाय व्हायडक्ट”]

5-Millau-Viaduct,-France
फ्रान्समधील हा पूल मायकेल व्हरलॉक्स आणि नॉर्मन फोस्टर या दुकलीने डिझाईन केला आहे. २००४ साली हा बांधून पूर्ण झाला तेव्हा तो जगातील सर्वाधिक उंच पूल होता आणि त्याची ही ख्याती २०१२ पर्यंत अबाधित होती. आता त्याचा हा मान मेक्सिकोतील बालार्ट ब्रिजकडे गेला आहे. मिलाय ब्रिज ११२५ फट उंचीवर केवळ केबलच्या आधारावर उभारला गेला आहे. तर्न नदीच्या दरीत दक्षिण फ्रान्समध्ये हा पूल असून तो ए ७५ व ए ७१ या ऑटो रूटचा एक भाग आहे. त्याची एकूण लांबी ८०७१ फूट असून त्यालाही २००६चा आऊटस्टँडींग वास्तूशिल्प पुरस्कार मिळालेला आहे.[nextpage title=”६)स्काय ब्रिज लंकावी”]

6-Langkawi-Sky-Bridge
मलेशियातील गुनुगमॅट चिंगचँग पर्वताचे शिखर ते पालाऊ बेट यांच्यात यांना जोडणारा ४१० फुटांचा हा वळणदार पादचारी सस्पेन्शन पूल आहे. पुलावर जाण्यासाठी अगोदर केबल कार राईड घ्यावी लागते. ओरिएंटल गावातून ही राईड समुद्रसपाटीपासून २३०० फूट उंचावर प्रवाशांना घेऊन जाते. तेथून आसपासच्या भागाचा, लंकावी बेटाचा मनोहर नयनरम्य देखावा डोळ्यात भरून घ्यायचा. या पुलाचा एक खांब ८२ मीटर ऊंचीचा आहे. असे सांगितले जाते की हा पूल पूर्णपणे अगोदरच जमिनीवर तयार केला गेला आणि नंतर त्याचे तुकडे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने वर नेऊन जोडण्यात आले. हा ब्रिज २००४ साली बांधून पूर्ण झाला. हा जगातील सर्वात लांब पादचारी सस्पेन्शन ब्रिज आहे.[nextpage title=”७)फोर्थ रेल्वे ब्रिज”]

7-The-Forth-Railway-Bridge
स्कॉटलंडमधील १८९० साली बांधून पूर्ण झालेला ८२९६ फूटांचा हा ब्रिज जगातील औद्योगिक क्रांती काळातील आश्चर्यातील एक मानला जातो.एडिनबरो आणि फिफे या शहरांना जोडणारा हा पूल व्हिक्टोरियन वास्तूशैलीचा पण अभियांत्रिकीच्या तंत्रज्ञानातील प्रगतीचा पुरावा आहे. त्याचे न्यूयार्कच्या ब्रुकलीन पुलाशी खूपच साम्य आहे. ३ पिजर्‍यांसारख्या कँटीलिव्हर ग्रॅनाईटच्या पायात बसविल्या गेल्या आहेत. हा ब्रिटनमधला पहिला पोलादी पूल असून अल्फ्रेड हिचकॉकच्या द ३९ स्टेप्स चित्रपटातही त्याचे दर्शन झाले आहे. स्कॉटीश करन्सीवरही या पूलाचे चित्र आहे. या पुलाची देखभाल हे न संपणारे काम आहे. त्यामुळेच स्कॉटलंडमध्ये न संपणार्‍या कामाला पेंटींग द फोर्थ ब्रिज अश्या म्हणीने संबोधले जाते. थोडक्यात तो भाषालंकारातही समाविष्ट झाला आहे.[nextpage title=”८) पाँट व्हेचिओ”]

8-Ponte-Vecchio,-Italy
इटालीमधील हा जुना दगडी कमानी पूल युरोपमधला सर्वात जुना असावा असे सांगितले जाते. फ्लॉरेन्सच्या आर्नो नदीचे पात्र जेथे अगदी अरूंद आहे तेथे हा पूल तीन कमानींवर स्थिरावला आहे. हा पूल १० व्या शतकातला असल्याच्या कांही खुणा सापडतात मात्र आर्नोला आलेल्या प्रलयंकारी पुरात त्याचे नुकसान झाल्याने तो १३४५ साली परत बांधला गेला. या पुलाच्या दोन्ही बाजूंना दुकाने आहेत. त्या प्रामुख्याने सराफ कट्टा आणि मटण मार्केट आहे. सध्या तेथे अजूनही कांही सराफी दुकाने आहेत तसेच आर्ट डिलर, जुन्या वस्तूंची विक्री करणारे व्हेंडार येथे ठाण मांडून आहेत. विशेष म्हणजे नाझींच्या तडाख्यातून हा पूल वाचला कारण खुद्द हिटलरने हा पुल नष्ट न करण्याच्या आज्ञा दिल्या होत्या असेही सांगितले जाते.[nextpage title=”९)ट्रीफ्ट ब्रिज”]

9-Trift-Bridge,-Switzerland
स्वित्झर्लंड च्या लेक ट्राफ्टसजवळच्या आल्प्स पर्वतरांगात १०० मीटर उंचीचा हा पादचारी सस्पेन्शन ब्रिज नेपाळी थ्री रोप ब्रिजच्या धर्तीवर उभारला गेला आहे. मूळ पूल २००४ मध्ये जोरदार वेगवान वार्‍यांमुळे मोडला तो पुन्हा २००९ मध्ये अधिक सुरक्षित आणि भक्कम स्वरूपात उभारला गेला. त्याला पॅराबोलिक अंडरस्पॅन दिला गेला आहे. त्यामुळे कोणत्याही जोरदार हालचालीवर नियंत्रण ठेवता येते. अर्थात ज्यांचे हृदय कोमल आहे म्हणजे जे घाबरट आहेत त्यांनी या पुलावर जाऊ नये हे उत्तम. कारण हा पूल झूलता आहे आणि जोरदार वार्‍यांमुळे तो प्रचंड हलतो. त्यामुळे पडण्याची भीती मनाला घेरते. मात्र धाडस करून पुलावर गेलात तर स्वर्ग म्हणजे काय असेल याचे दर्शन आसपासची सरोवरे, हिमनद्या, पर्वतराजी पाहून येते. या पुलावर जाण्यासाठीही केबल कारने वर जावे लागते. हा प्रवासही दीड तासाचा आहे.[nextpage title=”१०) गोल्डन गेट ब्रिज”]

10-Golden-Gate-Bridge
सॅन फ्रान्सिस्कोची ओळख असलेला हा पूल जोसेफ बी स्ट्राॅस या ब्रिज तज्ञाने १९३७ साली बांधला. पुलाला आणि तो बांधणार्‍या तज्ञाला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली आणि सॅन फ्रान्सिस्कोला त्याची ओळख. आधुनिक जगातले आश्चर्य म्हणून या ब्रिजकडे पाहिले जाते. हा पूल जगातील सर्वात सुंदर पूल म्हणूनही ओळखला जातो. हा सन्स्पेन्शन ब्रिजच आहे आणि तो बांधून पूर्ण झाला तेव्हा जगातला सर्वात लांबीचा सस्पेन्शन ब्रिज होता. त्याचा लाल नारिंगी रंग हे आकर्षणचे मुख्य केंद्र आहे. मात्र हा रंग या पुलाला दाट धुक्यातही तो दिसावा म्हणून दिला गेला होता. हा पूल आणखी एका वाईट कारणासाठीही प्रसिद्ध आहे. या पुलावरून आत्महत्त्या करणार्‍यांचे प्रमाण मोठे असून येथून उडी मारणार्‍याचा हमखास जीव जातोच असे सांगितले जाते.

Leave a Comment