मुंबई- बचत खात्यांसंदर्भात रिझर्व्ह बँकेने स्वीकारलेल्या कडक धोरणाची अम्मलबजावणी बँकांनी सुरू केली असून त्यात स्टेट बँकेने पुढाकार घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आणि बँकेकडून देण्यात आलेल्या आदेशांनुसार यापुढे खातेदार एका बँकेत एकच बचत खाते ठेवू शकणार आहे. यापूर्वी एकाच बँकेच्या विविध शाखांतून ग्राहक अनेक बचत खाते उघडू शकत असत. मात्र आता ज्यांची अशी अनेक बचत खाती आहेत त्यांना ती ३० दिवसांत बंद करावी लागणार आहेत.
एका बँकेत एकच बचत खाते ठेवता येणार
स्टेट बँकेने हा नियम लागू केला असून ग्राहकांना स्टेट बँकेच्या विविध शाखांत बचत खाती काढली असतील तर ती बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्टेट बँकेपाठोपाठ सर्वच बँका या आदेशाची अम्मलबजावणी करणार आहेत.