जगातील सर्वांत थंड शहर, शहराचे तापमान उणे ४५ डिग्री सेल्सिअस

russia
मॉस्को : ४ डिसेंबर रोजी न्यूयॉर्कच्या बफेलो भागात हिमवर्षाने ११६ वर्ष जुना विक्रम मागे टाकला. मागील वर्षी संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेचा हा भाग सात फूट जाडीच्या बर्फाच्या चादरीने आच्छादले होते. तुम्हाला माहीत आहे, का जगातील असा एक भाग आहे जिथे वर्षाचे ३६५ दिवसही कडाक्याची थंडी असते. सैबेरियातील या शहराचे नाव याकूत्सक आहे.

जगातील सर्वांत थंड शहर म्हणून रशियातील याकुत्सक ओळखले जाते. हे शहर आर्कटिक्ट रेषेपासून केवळ ४५० किलोमीटर दक्षिणेत लेना नदीच्या काठावर वसले आहे. तिची लोकसंख्या २७ लाख आहे. थंडीत येथील तापमान उणे ४५ डिग्री सेल्सिअसच्या खाली जाते. वृत्तानुसार शहराचे आतापर्यंतचे किमान तापमान उणे ७१ दशांश २ डिग्री सेल्सिअस आणि कमाल ३३.३ डिग्री सेल्सिअस नोंदले गेले आहे.याकुत्सकमधील तापमान सर्वसाधारणपणे येथे १२ मे ते १० सप्टेंबरपर्यंत उन्हाळा असतो. या दरम्यान तापमान १२ डिग्री सेल्सिअस इतकी असते. १७ जुलै हा येथील सर्वात उष्ण दिवस असतो. या दिवशी कमाल तापमान २५ डिग्री सेल्सिअस असते. दुसरीकडे हिवाळा १८ नोव्हेंबरला सुरू होतो आणि १ मार्चपर्यंत असते. या दरम्यानचे तापमान उणे २३ डिग्री सेल्सिअस असते. १३ जानेवारी सर्वांत थंड दिवस असतो. या दिवशी तापमान कमाल उणे ३६ डिग्री सेल्सिअस आणि किमान उणे ४५ डिग्री सेल्सिअस असते.

Leave a Comment