नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्रालय टपाल खात्यातर्फे सुरू असलेले बचत खाते आणि पीपीएफ खात्यात जमा करण्यात येणा-या ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा विचार करीत असून, यासंबंधीचा निर्णय या महिन्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यामुळे छोट्या ठेवीदारांमध्ये नाराजी व्यक्त होऊ शकते.
बचत खात्याच्या व्याजदरात कपात?
भारतीय रिझर्व्ह बँकेने छोट्या ठेवीदारांना देण्यात येणा-या व्याजदरात कपात करण्यासंबंधी सरकारवर दबाव वाढवला आहे. या बचत खात्यांतील व्याजदर बँकांच्या दराप्रमाणे करण्यात यावा, असा आग्रह बँकांनी धरला होता. त्यातच रिझव्र्ह बँकेने यासंबंधी दबाव वाढविल्याने केंद्र सरकार याबाबत अनुकूल विचार करीत असून, या महिन्याच्या अंतापर्यंत यासंबंधीचा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे ठेवीदारांमध्ये नाराजी वाढू शकते. रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यास बँकांवर छोट्या ठेवींसाठी ८.७ ते ९.३ टक्क्यांपर्यंत मिळणा-या व्याजाशी सामना करण्याचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत ते आपले धोरण ठरविण्यास असमर्थ आहेत. त्यातूनच टपाल खात्यातील बचत खाते आणि पीपीएफच्या व्याजदरात कपात करण्यासंबंधी बँकांनी रिझर्व्ह बँकेवर दबाव वाढविल्यामुळे केंद्र सरकार या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत छोट्या बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करण्यासंबंधी निर्णय घेऊ शकते.