स्मार्टफोन दुनियेत आता व्होल्टचा धमाका

volte
भारतीय स्मार्टफोन बाजारात फोरजी हँडसेटनंतर आता व्होल्ट (व्हॉईस ओव्हर एलटीई) चा धमाका अपेक्षित आहे. म्हणजे लवकरच अनेक कंपन्यांचे फोर जी बरोबरच व्होल्टला सपोर्ट करणारे हँडसेट येथे दाखल होतील. या सुविधेमुळे युजर हायस्पीड डेटा नेटवर्कवर गप्पागोष्टी करू शकतील. एलजी, लेनोवो, मायक्रोमॅक्स, इंटेक्स या कंपन्या त्यांच्या युजर्ससाठी ही डिव्हायसेस उपलब्ध करून देण्यासंबंधी गंभीरपणे विचार करत आहेत. कारण येथील टेलिकॉम ऑपरेटर्सनी एलटीई (लाँग टर्म इव्होल्यूशन) वापराने ही सेवा ऑफर करण्याची सुरवात केली आहे.

हे तंत्रज्ञान जगात अजून नवीन आहे. यामुळे व्हाईस व डेटा दोन्हीसाठी बँड स्विच न करताच काम करता येते. सर्वेक्षणांच्या अहवालानुसार भारतातील २ टक्के स्मार्टफोन धारकांचे हँडसेट व्होल्ट तंत्रज्ञानासाठी अपग्रेडेबल आहेत. त्यात अॅपल आयफोन्सचाही समावेश आहे. यासाठी कमीतकमी १० हजार रूपये किमतीचे हँडसेट युजरला वापरावे लागतील. लेनोवोने असे हँडसेट विकायला सुरवात केली आहे. भारतात रिलायन्स जिओ व्होल्ट सुविधेसहच लाँच होईल असेही सांगितले जात आहे. यामुळे युजरला बेस्ट व्हाईस कवालिटी मिळू शकणार आहे.

Leave a Comment