व्हॉट्सअॅपला चारचांद लावणार नवे इमोजी

emoji
नवी दिल्ली : दिवसेंदिवस व्हॉट्सअॅपची लोकप्रियता वाढतच असून आपल्या अँड्रॉईड यूजर्ससाठी लवकरच एक नवीन अपडेट घेऊन व्हॉट्सअॅप येत आहे. चॅटिंगची मजा आता या नव्या व्हर्जनमुळे अधिकच वाढणार आहे.

व्हॉट्सअॅपवर इमोजीद्वारे मेसेज पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. समोरच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचवण्यासाठी या इमोजी मोठी मदत करत असल्यामुळे इमोजीची वाढती क्रेझ पाहता व्हॉट्सअॅप नव्या व्हर्जनमध्ये धमाकेदार नव्या इमोजी आणणार आहे. तसेच यापूर्वी व्हॉट्सअॅप इमोजीचे केवळ पाच टॅब आपल्याला दिसत होते. मात्र नव्या अपडेटमध्ये या टॅबची संख्या आठ असेल. ज्यात स्पोर्ट्स, फ्लॅग, बल्ब आणि खाण्याच्या पदार्थांचा नवा सेक्शन असेल. सर्वात आधी हे अपडेट नेक्सस सीरिजमधील स्मार्टफोनमध्ये येतील त्यानंतर इतर अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये हे अपडेट दिसतील.

Leave a Comment