पेट्रोल-डिझेल एक रुपयाने होऊ शकते स्वस्त

petrol
नवी दिल्ली – ४० डॉलर प्रति बॅरलपर्यंत कच्च्या तेलाचा भाव कमी झाल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीत १ रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे. ऑईल कंपन्या लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचा आढावा घेणार असून त्यानंतर दर कपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये कपात न करण्याचा निर्णय कच्च्या तेलाचे ४० टक्के उत्पादन करणाऱ्या देशांच्या ओपेक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आल्यामुळे त्याचा परिणाम या उत्पादनांच्या किमतीवर पाहण्यास मिळत आहे. दरम्यान मागच्या वर्षीदेखील कमी होणाऱ्या किमतींनंतर देखील उत्पादन कपातीचा निर्णय घेण्यात आला नव्हता.

Leave a Comment