उद्यापासून धावणार मुंबई-मडगाव डबलडेकर एसी रेल्वे

double-deccar
मुंबई – गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या कोकण आणि मुंबईतील प्रवाशांचे स्वप्न असणारी वातानुकूलित डबलडेकर रेल्वेला अखेर महापरिनिर्वाण दिनाचा मुहूर्त मिळाला. त्यामुळे रविवार ६ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस या एसी डबलडेकर एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.

एसी डबलडेकर गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात चालविण्यात आली होती. मात्र तिकीटांचे वाढणारे दर लक्षात घेता प्रवाशांनी या गाडीकडे पाठ फिरवली. त्यानंतर ही गाडी अयशस्वी झाल्याने तिला दक्षिणेकडे पाठवण्याचा घाट रेल्वेच्या अधिकाऱ्याने घेतला होता. मात्र, मुंबई आणि कोकणातील प्रवाशांचे स्वप्न असलेल्या या रेल्वेला सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आता हिरवा कंदील दिला आहे. या डबलडेकर रेल्वे सेवेबाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनीही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली होती. त्यामुळे आता गाडी नं ११०८५ ही डबलडेकर एसी एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता सुटणार असून मडगावला सायंकाळी साडेपाच वाजता पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी दर मंगळवारी, गुरुवारी अणि शनिवारी सकाळी सहा वाजता सुटणार आहे.

Leave a Comment