आता लहान मुलांचेही काढावे लागणार फुल तिकीट

railway
नवी दिल्ली : रेल्वेच्या हाफ तिकीटाच्या दरामध्ये पुढील वर्षी एप्रिल महिन्यापासून बदल करण्यात आला असून ५ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांचे तिकीट आरक्षित करताना रेल्वेने पूर्ण तिकीटाचे दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

लहान मुलांच्या तिकीटाच्या सुधारित दरानुसार ५ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांचे आरक्षण करताना त्यांच्याकडून पूर्ण तिकीटाची रक्कम घेण्यात येईल. मात्र अनारक्षित तिकीटांसाठी लहान मुलांचे हाफ तिकीटच काढण्यात येईल.

५ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांना जर पूर्ण बर्थ हवा असेल तर पूर्ण तिकीट काढावे लागेल, मात्र बर्थ अथवा सीट नको असल्यास त्यांच्याकडून हाफ तिकीटच आकारण्यात येईल. हाफ तिकीटासाठी बदल एप्रिल २०१६ नंतर केल्या जाणाऱ्या प्रवासांतील लागू करण्यात येईल. काही दिवसांनी त्याची नेमकी तारीख जाहीर करण्यात येणार आहे. लवकरच रिझर्व्हेशन फॉर्ममध्ये देखील आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. पाच वर्षाखालील मुलांना मात्र मोफत प्रवासाचा आनंद (विदाऊट सीट) लुटता येणार आहे.

Leave a Comment