लवकरच आसूसच्या जेनफोन २ लेजरची विक्री

asus
मुंबई: लवकरच भारतात जेनफोन २ लेजर (ZE601KL)ची विक्री करण्याची घोषणा मोबाइल कंपनी आसूसने केली आहे. १७,९९९ एवढी या स्मार्टफोनची किंमत असून हा फोन ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलवर उपलब्ध असेल. आसुसने या स्मार्टफोन आधी जेनफोन २ लेजर ५.५ हा स्मार्टफोन लाँच केला होता आणि ज्याची किंमत १३,९९९ रु. होती.

आसूसच्या जेनफोन २ लेजर (ZE601KL) फोनचे फिचर्स : यात ६ इंचाचा फुल-एचडी आणि १०८०×१९२० पिक्सल रेझ्युलेशनचा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ४ कोटिंग करण्यात आले आहे. हा फोन ड्युल सिम सपोर्ट करतो. यात ६४ बिट ऑक्टा कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६१६ चा प्रोसेसर देण्यात आला आहे. याचे रॅम ३ जीबी असून, यात इंटरनल मेमरी १६ जीबीची देण्यात आली आहे. यात रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सल, तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. याच्या बॅटरी क्षमता ३००० mAh एवढी आहे.

Leave a Comment