आता खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही मिळणार निवृत्ती वेतन

private-sector
नवी दिल्ली : तुम्ही जर का खासगी नोकरदार असाल तर तुमच्यासाठी ही गुडन्यूज आहे. आता खासगी नोकरदारांनाही केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेद्वारे रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार आहे.

पोस्टात या योजनेंतर्गत एक विशिष्ट रक्कम दरमहिन्याला जमा केली जाईल. या रकमेतून पेन्शनची सुविधा दिली जाणार आहे. योजनेंतर्गत पोस्टामध्ये खाते खोलले जाईल. डिसेंबर महिन्यात ज्या नोकरदारांचे खाते खोलले जाईल त्यांच्या खात्यात केंद्र सरकार पाच हजार रुपये जमा करणार आहे. मासिक, त्रैमासिक पद्धतीने तुम्ही खात्यात रक्कम जमा करु शकता.

वयानुसार त्या व्यक्तीला पेन्शनची रक्कम दिली जाईल. कमीत कमी एक हजार आणि जास्तीत पाच हजारांपर्यंत पेन्शनची रक्कम मिळणार आहे. एक हजार रुपये पेन्शन मिळणाऱ्या व्यक्तींना पोस्टाकडून १.७ लाख आणि पाच हजार रुपये पेन्शनच्या खातेधारकांना मृत्यूनंतर ८.५ लाख रुपयांची रक्कम मिळेल. पेन्शन योजनेसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment