सॅमसंगने लाँच केले आणखी तीन नवे स्मार्टफोन

samsung
मुंबई: गॅलक्सी सीरिजमधील बहुचर्चित ३ नवे स्मार्टफोन गॅलक्सी ए३, गॅलक्सी ए५ आणि गॅलक्सी ए७ मोबाइल कंपनी सॅमसंगने लाँच केले आहेत.
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे तीनही स्मार्टफोन चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. मात्र, याच्या किंमती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत. इतर देशातही लवकरच हे स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत.

गॅलक्सी ए७ची खासियत – याची स्क्रीन ५.५ इंच फूल एचडी असून त्याचे रेझ्युलेशन १०८०×१९२० पिक्सलस आहे. हा ड्यूल सिम सपोर्ट असून याचा प्रोसेसर १.६ GHz ऑक्टा कोअरचा आहे आणि यात ३ जीबीचे रॅम देण्यात आले आहेत. याची इंटरनल मेमरी १६ जीबीची असून याची मेमरी १२८ जीबी पर्यंत वाढविता येऊ शकते. याचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सलचा तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. याचे ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड ५.१ लॉलिपॉप बेस आहे. हा फोन ४जी सपोर्ट असून यात फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आल आहे. याच्या बॅटरीची क्षमता ३३००mAh एवढी आहे.

त्याचबरोबर ए ७ प्रमाणेच गॅलक्सी ए५ स्मार्टफोनचे फीचर जवळजवळ सारखेच आहेत. यात फक्त ५.२ इंचाचा फूल एचडी स्क्रिन देण्यात आली आहे. रॅम २ जीबी, ४जी सपोर्ट आणि फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील आहे. याच्या बॅटरीची क्षमता २९००mAh एवढी आहे.

गॅलक्सी ए३ स्मार्टफोनची खासियत – याची स्क्रीन ४.७ इंच फूल एचडी असून त्याचे रेझ्युलेशन ७२०×१२८० पिक्सलस आहे. हा ड्यूल सिम सपोर्ट असून याचा प्रोसेसर १.५ GHz क्वॉड कोअरचा आहे आणि यात १.५ जीबीचे रॅम देण्यात आले आहेत. हा फोन ४जी सपोर्ट असून यात फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आल आहे. याच्या बॅटरीची क्षमता २३००mAh एवढी आहे.

Leave a Comment