येथील माणसांची बोलती आहे बंद

bali
जगाच्या पाठीवर अनेक प्रकारची गांवे आहेत. इंडोनेशियाच्या बाली बेटावरील बेंगकला गाव असेच आगळेवेगळे गांव आहे. हे गांव मुक्याबहिर्‍यांचे गांव म्हणून प्रसिद्ध असून येथील नागरिक सर्व व्यवहार खाणाखुणांच्या सहाय्यानेच करतात. गेल्या कित्येक पिढ्यात येथे कुणी बोललेले नाही. केवळ गांवकरीच नाही तर येथील कार्यालयांचे कामकाजही अशा खाणाखुणांनीच केले जाते.

येथे बाहेरून येणार्‍यांची संख्या फारशी नाही त्यामुळे गांवकरीच गावाची सर्व व्यवस्था पाहतात. त्यांच्या खाणाखुणा ही एक प्रकारची सांकेतिक भाषा असून त्याला काटा कोलोक असे नांव आहे. ही भाषा अनेक शतके जुनी आहे. असे सांगितले जांते की या गावातील लोकांत फार पूर्वीपासूनच देशाच्या अन्य भागातील लोकांपेक्षा मुकबधिरांचे प्रमाण अधिक आहे. जन्मापासूनच हे वैगुण्य असणार्‍यांची संख्याही मोठी आहे. त्यामागे येथील भौगोलिक स्थिती हे कारण असल्याचेही सांगितले जाते. परिणामी येथे काटा कोलोक भाषा विकसित झाली व त्यातूनच सर्व व्यवहार केले जातात.

Leave a Comment