फ्लिपकार्टला डिस्काऊण्ट पडला महागात

flipkart
मुंबई : देशातल्या सर्वात मोठ्या ऑनलाईन रिटेलिंग कंपनीला डिस्काऊण्टच्या गर्तेत चांगलाच फटका बसला असून ई-कॉमर्स क्षेत्राच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दिलेला डिस्काऊण्ट अंगलट आल्याने फ्लिपकार्ट कंपनीला तब्बल २ हजार कोटींचा तोटा झाला आहे. हे नुकसान मार्च २०१४ ते २०१५ या आर्थिक वर्षात झाले आहे.

स्नॅपडील, अॅमेझॉन इंडियासारख्या प्रतिस्पर्धींच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी आणि ऑनलाईन ग्राहक खेचण्यासाठी फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांना मोठे डिस्काऊण्ट दिले होते. फ्लिपकार्ट इंटरनेटला १०९६.४ कोटींचा तर फ्लिपकार्ट इंडियाला ८३६.५ कोटींचा फटका बसला आहे. मात्र या आर्थिक स्थितीबाबत कुठलेही भाष्य करण्यास फ्लिपकार्टच्या प्रवक्त्यांनी नकार दिला आहे.

Leave a Comment