टीसीएलचा प्राईड टी ५०० भारतात सादर

tcl
चीनी कंपनी टीसीएलने त्यांचा आयरिस स्कॅनर स्मार्टफोन प्राईड टी ५०० भारतात लाँच केला असून तो ईकॉमर्स साईटवर १०४९९ रूपयांना उपलब्ध आहे. या फोनमध्ये डोळ्याचा रेटिना फ्रंट कॅमेर्‍याच्या सहाय्याने स्कॅन करून फोन अनलॉक करता येतो. कंपनीने भारतातला या प्रकारचा हा पहिलाच फोन असल्याचा दावा केला आहे. २०१४ साली व्ह्यू सॉनिकने व्ही ५५ स्मार्टफोन लाँच केला होता तोही आयरिस स्कॅनरसह होता. मात्र हा फोन भारतात विक्रीसाठी आला नव्हता.

या फोनसाठी अँड्राईड लॉलीपॉप ५.१ ओएस दिली गेली आहे.५ इंची डिस्प्ले,२ जीबी रॅम, १३ एमपीचा रियर कॅमेरा, ८एमपीचा फ्रंट कॅमेरा, १६ जीबी इंटरनल मेमरी अशी त्याची अन्य फिचर्स असून तो ड्युअल सिम आहे. ही दोन्ही सिम ४ जी एलटीआय नेटला सपोर्ट करतात. याशिवाय थ्रीजी, जीआरपीएस, एज, वायफाय, ब्ल्यूटूथ, मायक्रो यूएसबी अशी अन्य कनेक्टीव्हीटी ऑप्शनही आहेत.

Leave a Comment