चेन्नई- चेन्नई पुराचे संकट ओढविल्यानंतर पहिल्या दोन दिवसांतच विमा कंपन्यांकडे नुकसान भरपाईसाठीचे दावे मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागले असून आत्ताचे सुमारे ५०० कोटींचे दावे आले आहेत. ही संख्या अजून खूपच वाढेल असे विमा कंपन्यांचे म्हणणे आहे. मुंबईतील २००५ च्या पूरस्थितीत ३ हजार कोटींचे विमा दावे विमा कंपन्यांकडे आले होते. चेन्नईत त्यापेक्षाही अधिक रकमेचे विमा दावे येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या दाव्यात सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांचा समावेश अधिक आहे. व्यावसायिक आणि औद्योगिक विमा दावे अधिक प्रमाणात आले आहेत.
चेन्नई पुरामुळे विमा कंपन्यांना मोठा झटका
आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुन्सचे संजय दत्त म्हणाले त्यांच्याकडे आत्तापर्यंत ५०० कोटींचे दावे आले आहेत.त्यात वाहन विमाधारकांचे प्रमाण अधिक आहे. यूटीआयकडे नोव्हेंबरच्या मध्यात झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात तेव्हाच ११० कोटींचे दावे दाखल झाले होते. ही रक्कम आणखी वाढते आहे. विशेष म्हणजे या संकटात १८० जणांचा मृत्यू होऊनही अजून एकही जीवन विम्याचा दावा दाखल झालेला नाही.