नवी दिल्ली : जागतिक बाजारातील सोन्याच्या घटत्या दराचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होत असल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता असल्यामुळे सोने खरेदीसाठी निघाला आहात? तर आणखी थोडे दिवस थांबा. सोने १५ डिसेंबरपर्यंत २५ हजाराहूनही कमी होण्याची शक्यता आहे.
आणखी स्वस्त होणार सोने
तसेच व्याजदर वाढीचे फेडरल रिझर्व्ह बँकेनेही संकेत दिल्याने त्याचा परिणाम सोने खरेदीवर झाला आहे. खरेदीच्या प्रमाणात घसरण झाल्याने देशांतर्गत बाजारात हे सोने पडून आहे. गुरुवारी सोन्याने चार महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली. डॉलरही मजबूत झाल्याने आपसूकच सोने घसरणीवर त्याचा परिणाम झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. पुढील पंधरवड्यात सोन्याचे दर प्रति तोळा २५ हजाराहूनही कमी होण्याची शक्यता आहे.