नाशिक- अॅपलने वार्षिक दोन कोटी ३६ लाख रूपये पॅकेजची ऑफर नाशिकमधील भुजबळ नॉलेज सिटीतील बी.ई.च्या तिस-या वर्षातील अजिंक्य लोहकरेला दिली असून येत्या ९ डिसेंबरला तो प्रशिक्षणासाठी कॅलिफोर्नियाला रवाना होणार आहे. ‘फेसबुक’ ‘व्हॉट्सॲप’ला टक्कर देणा-या एजे बुक या सॉफ्टवेअरची निर्मिती कोपरगाव येथील अजिंक्यने केल्याने ‘ॲपल’ने त्याची दखल घेतली असून त्याच्या या अॅपची बड्या कंपन्यांना भुरळ पडली आहे.
नाशिककर अजिंक्यने स्वीकारली ‘ॲपल’ची ऑफर
इन्फोसिसमध्ये सध्या अजिंक्य कार्यरत असून ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील इन्फोसिसच्या प्रोजेक्टवर काही काळ त्याने काम पाहिले. आता त्याने अॅपलची ऑफर स्वीकारली आहे. यापूर्वीही अजिंक्यला एका कंपनीने दीड कोटींची ऑफर दिली होती. अनेक मोबाईल, सॉफ्टवेअर कंपन्यांनी अजिंक्यच्या सर्जनशीलतेचा गौरव केला आहे. अजिंक्यने यापूर्वी लॅपटॉप रेकग्नायजेशन सॉफ्टवेअर तयार केले आहे.