रतन टाटा २६-११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर खचून गेले होते

ratan-tata
वडोदरा- टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी मुंबईमध्ये २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपण खूप खचून गेल्याची कबुली दिली.

मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर मी सहा महिने कोणाशी बोललो नाही, माझ्या डोक्यात सतत तेच विचार येत असत, तसेच मी खूप खचलो होतो, असे रतन टाटा यांनी म्हटले. हा खूप मोठा मानसिक धक्का माझ्यासाठी होता असे रतन टाटा यांनी म्हटले. त्यांना सयाजी रत्न पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार बडोदा मॅनेजमेंट असोसिएशन तर्फे देण्यात येतो. या घटनेने माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले असे टाटा म्हणाले. आज ज्या प्रकारे मी बोलत आहे त्याप्रमाणे मला बोलता देखील येत नव्हते असे ते म्हणाले. दर संध्याकाळी मी रुग्णालयाला भेट देत असे. तेथे गेल्यावर माझ्या लक्षात आले की जखमींचे बिल देण्यासाठी देखील कोणाकडे पैसे नाही. त्यांच्या मदतीसाठी आम्ही अनेकांनी एकत्र मिळून मदत केली असे ते म्हणाले.

Leave a Comment