फेसबुकमध्ये मिळते तब्बल साडेतीन लाखाचे विद्यावेतन

facebbok
कॅलिफोर्निया : फेसबुकच्या मुख्यालयात उमेदवारी करणाऱ्यांना दर महा तब्बल साडे तीन लाख रुपयांचे विद्यावेतन दिले जाते. त्याच प्रमाणे नाश्ता, जेवण,आईसक्रिम, कॉकटेलही मोफत मिळते. तसेच या उमेदवारांना खुद्द फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गसोबत चर्चेची संधीही मिळते.

फेसबुकचे मुख्यालय हे जगातील सर्वाधिक सुविधा असलेल्या जागांपैकी एक आहे. फेसबुकमध्ये इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर येथून बाहेर पडण्याची इच्छा होत नाही. इंटर्नशिपचा काळ कधी संपला ते आम्हाला कळलेच नाही, असे फेसबुकमध्ये इंटर्नशिप केलेल्या एलिझाबेथ हिने सांगितले. येथील कर्मचाऱ्यांचे शिकाऊ उमेदवारांशी वर्तनही चांगले असते; असे तिने नमूद केले.

झुकरबर्ग हे देखील अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे डेस्कवर बसून काम करतात. त्यांचा डेस्कही पूर्णपणे कॉमन आहे. दर गुरुवारी सर्व कर्मचारी कॉकटेल एंजॉय करतात. हॅप्पी आवरमध्ये गेम्सही खेळले जातात, असे आणखी एका उमेदवाराने यावेळी सांगितले.

Leave a Comment