एअर इंडियाने सुरु केली भारत-सॅन फ्रान्सिस्को विना थांबा विमानसेवेची सुरुवात

lohani
नवी दिल्ली – एअर इंडियाने बुधवारपासून भारत-सॅन फ्रान्सिस्को दरम्यान विना थांबा विमानसेवेचा शुभारंभ केला आहे. एअर इंडियाची ही पहिलीच नॉन स्टॉप सेवा आहे. आजपासून सुरू झालेल्या या पहिल्या फेरीसाठी ९० टक्केहून अधिक सीट बुक झाल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात सिलीकॉन व्हॅलीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या भेटीच्यावेळी या योजनेची घोषणा केली होती.

एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी लोहानी यांनी सांगितले की, सॅन फ्रान्सिस्कोसाठी सुरू करण्यात आलेल्या सरळ प्रवाशी वाहतुकीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एअर इंडियाकडून आठवड्यातून ३ दिवस भारत ते सॅन फ्रान्सिस्को विना थांबा विमानसेवा दिली जाईल. प्रत्येक रविवार, बुधवार आणि शुक्रवारी दोन्ही देशांदरम्यान नॉन स्टॉप विमानसेवा असेल.

Leave a Comment