लिसा पाथफाईंडर अवकाशात रवाना

plane
पॅरिस: विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी वर्तविल्याप्रमाणे गुरुत्वाकर्षणाच्या लहरी खरोखरच दृष्टीस पडतात का; याचा अभ्यास करण्यासाठी फ्रान्स येथील कोरू या अंतरिक्ष केंद्रावरून ‘लिसा पाथफाईंडर’ हे अवकाश यान अंतराळात रवाना झाले आहे.

आईनस्टाईन यांनी १०० वर्षापूर्वी सापेक्षता सिद्धांत मांडताना गुरुत्वाकर्षणाच्या लहरी दृष्टीला दिसू शकतील; अशी शक्यता वर्तविली होती. या शक्यतेचा अभ्यास करण्यासाठी लिसा पाथफाईंडर हे अवकाश यान अंतराळात पाठविण्यात आले आहे.

हे यान गुरुत्वाकर्षण नसलेल्या जागी पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर स्थिर होऊन गुरुत्वाकर्षण तरंगांचा भ्यास करेल. दोन कृष्ण विवरे एकत्र येण्याने किंवा तारा तुटल्यानंतर गुरुत्वाकर्षणाच्या लहरी निर्माण होतात. त्याचे निरीक्षण करण्यासाठी लिसा पाथफाईंडरमध्ये विशेष यंत्रणा बसविण्यात आली आहे.

Leave a Comment