कांद्यापाठोपाठ लसणीच्या किमतीही चढल्या

arlic
मुंबई – सर्वसामान्य ग्राहकांची पाठ न सोडणार्‍या महागाईने आता ग्राहकांसाठी लसूण हीही चैनीची वस्तू बनविली आहे. रोजच्या आहारातील तूर डाळ, तेले यांच्या दरांनी विक्रम नोंदविल्यानंतर आता कांदे, टोमॅटो पाठोपाठ लसूणही ग्राहकांसाठी चैनीची ठरणार आहे. वाशीच्या बाजारात लसूण सध्या २०० रूपये किलोवर पोहोचली असून नवीन पिक हाती येईपर्यंत हे भाव उतरण्याची शक्यता नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.

सध्या कांदा आणि टोमॅटोचे ठोक दर थोडेफार उतरले आहेत मात्र सर्वसामान्यांना किरकोळीने अद्यापीही कांदा टोमॅटोसाठी किलोला ४० ते ६० रूपये मोजावे लागत आहेत. मुंबईतील व्यापार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार वाशी बाजारात दररोज साधारण १५ ते २० ट्रक लसणीची आवक होत असते मात्र अवकाळी पावसामुळे ही आवक ५ ते ६ ट्रकवर आली आहे. परिणामी मागणी व पुरवठा यातील तफावतीमुळे दरवाढ झाली आहे.लसणीचे नवे पीक बाजारात येण्यास आणखी दोन महिने आहेत. तोपर्यंत हे भाव चढेच राहतील असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment