आर्थिक विकास दरात महाराष्ट्र आघाडीवर

gsdp
नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्य देशात राज्यांच्या अर्थिक विकास दर अर्थात जीएसडीपीमध्ये द्वितीय क्रमांकावर असून राज्याचा आर्थिक विकास दर ११.६९ टक्के इतके आहे म्हणजेच जीएसडीपी १६,८७० अब्ज रुपये इतका आहे. सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून महाराष्ट्र पुढे येत आहे मात्र बिहारने आर्थिक विकास दरात महाराष्ट्रापेक्षाही बाजी मारली आहे. देशात बिहारचा जीएसडीपी १७.०६ टक्के इतका अधिक आहे. उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू ही राज्येदेखील दुस-या स्थानी आहेत मात्र महाराष्ट्राच्या बरेच मागे आहेत. या दोन राज्यांचा जीएसडीपी प्रत्येकी ९,६७० इतका आहे. बिक्रवर्क रेटिंग्सच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

जीएसडीपीमध्ये उद्योगांच्या योगदानाचा जेव्हा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा गुजरात महाराष्ट्राच्या पुढे असल्याचे दिसून येते. गुजरातच्या आर्थिक विकास दरात उद्योगांचे योगदान २७.२६ टक्के इतके आहे. तर महाराष्ट्राच्या आर्थिक विकास दरात उद्योगांचे योगदान २५.१८ टक्के इतके आहे.

Leave a Comment