नवी दिल्ली – आता पीएफ काढण्याची प्रक्रिया ईपीएफओने आणखी सोपी केली असून, त्यासाठी कर्मचारी कार्यरत असलेली कंपनी किंवा पूर्वीची कंपनी यांच्याकडून सही आणि शिक्क्याची आवश्यकता नाही. त्या अनुषंगाने पीएफच्या दाव्यासाठी अर्ध्या पानाचा सरल फॉर्म जारी केला आहे. ज्यांना यूएन मिळाला त्या सर्व कर्मचाऱ्यांना ही सुविधा लागू झाल्यामुळे पीएफ काढण्याची कमी वेळ लागणार आहे.
पीएफ काढण्यासाठी आता कंपनीच्या सही, शिक्क्याला करा बायबाय
सध्या जर आपल्या खात्यातून कर्मचाऱ्याला पीएफ काढायचा असेल तर त्याला हाताने लिहलेले आवेदन पत्र कार्यरत कंपनी किंवा पूर्वीच्या कंपनीकडे द्यावे लागते. या आवेदनपत्राला संबंधित कंपनीकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक होते. आता हा निमय शिथील करण्यात आला आहे. ज्या पीएफ खातेदारांचा यूनिवर्सल नंबर (यूएएन) क्रमांक सक्रिय आहे त्या सर्वांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. बँक खाते आणि आधार क्रमांक आणि केवाईसीची माहितीसुद्धा यूएएनला जोडलेली असते.
आता या वर्षांपासू पीएफचे पैसे ऑनलाईन काढता येणार आहेत. कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून (ईपीएफओ) ही माहिती देण्यात आली आहे. यामुळे आता 6 कोटी ग्राहकांना त्यांच्या पीएफ अकाऊंटमधून ऑनलाईन पैसे काढता येणार आहेत. पुढील तीन महिन्यांमध्ये ही सुविधा सुरू केली जाणार आहे.
Nice…
Thanks…..Sir
Thanks ….for help…..