जगातील मौल्यवान दुर्मिळ हिरे[nextpage title=” “]
कोणे एकेकाळी प्रतिष्ठेचे लक्षण म्हणजे स्टेटस सिंबॉल मानले जाणारे हिरे हे राजेरजवाडे, धनाढ्य आणि श्रीमंताची मक्तेदारी होती. आता जग बदलले तरी हिर्याचे आकर्षण मात्र तसूभरही कमी झालेले नाही. डायमंडस आर फॉरएव्हर हे बिरूद अजूनही हिर्यासाठी लागू आहे. झाले एक की आता हिरा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. आजकाल सर्वसाधारण गटांतही हिर्याचे दागिने सर्रास घेतले जातात. अर्थात म्हणून हिर्याची पत घसरली असे मात्र मुळीच नाही. उलट हिर्याबाबत जागृती होते आहे त्यामुळे जगातील सर्वोत्तम हिर्याबाबत जाणून घेण्यासही लोकांना आवडते आहे.
जगातील मौल्यवान दुर्मिळ हिरे
डायमंड या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्दापासून झाली आहे. त्याचा अर्थ आहे, जो कधीही नाश पावत नाही असा. हिंदू संस्कृतीत वीज खडकांवर आदळून त्यातून हिरे बनतात असा समज होता. ग्रीक लोक हिर्यांना देवाचे अश्रू असे म्हणत असत. तर रोमन लोकांना तार्यांचे तुकडे म्हणजे हिरे असे वाटत होते. हिरा हा कायमच प्रेमाचे प्रतीक राहिला आहे. जगातील सर्वात मौल्यवान १२ हिर्यांसंबंधी थोडे जाणून घेऊ या.
१) अल्नॅट डायमंड
जगातील मौल्यवान हिर्यांमधील हा १२ नंबरचा हिरा. पिवळ्या रंगाचा हा हिरा उत्तम कटिंग केलेला १०१.२९ कॅरटचा आहे. त्याची क्लॅरीटी अतिशय उच्च दर्जाची आहे आणि म्हणून तो दुर्मिळ समजला जातो. अल्फ्रेड अर्नेस्ट अॅल्मॅट हे त्याच्या मूळ मालकाचे नांव. तो इंग्रज उद्योजक आणि फिलांथ्रोपिस्ट होता. हा हिरा डि बिअर्स खाणीतून मिळाला आणि त्याची किंमत आहे ३ दशलक्ष डॉलर्स.[nextpage title=”२)मौसाईफ रेड”]
लाल रंगाचे हिरे मुळातच दुर्मिळ. त्यातही मोठ्या आकाराचे आणि अगदी लाल रंगाचे फारच थोडे हिरे अस्तित्त्वात आहेत. अर्थात म्हणूनच त्यांच्या किमतीही खूप आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या प्युअर रेड हिर्यांमधला हा सर्वात दुर्मिळ आणि महाग हिरा आहे. त्याचे नाव रेड शील्ड असेही आहे.त्रिकोणी आकाराच्या हिर्याचे वजन आहे ५.११ कॅरट. मौसाईफ ज्युवेलर्स नी तो २०१२ साली ८ दशलक्ष डॉलर्सना खरेदी केल्यावर त्यांच्याच नावाने तो ओळखला जातो. ब्राझीलमधील एका खाणीत तो एका शेतकर्याला सापडला होता.[nextpage title=”३) हार्ट ऑफ इटर्निटी”]
हा निळ्या रंगाचा दुर्मिळ हिरा दक्षिण आफ्रेकेतील प्रिमियर डायमंड खाणीत मिळाला. या खाणीत बहुतेक निळ्या रंगाचे हिरे मिळाले आहेत. स्टेनमेट्झ ग्रुपची मालकी या हिर्यावर आहे. त्यांनी हा हिरा डी बिअर्सला विकला व तेथून तो सईद कैद्री याने १६ दशलक्ष डॉलर्सला खरेदी केला.[nextpage title=”४) आर्चड्यूक जोसेफ डायमंड”]
७६ कॅरेट वजनाचा हा हिरा ख्रिस्टी ऑक्शन हाऊसने जिनिव्हा येथील लिलावात २१.५ दशलक्ष डॉलर्सला विकला. हा हिरा कलरलेस आहे. आणि त्याच्या विक्रीचे हे जागतिक रेकॉर्ड आहे. हा आयताकृती हिरा भारताच्या गोलकोंडा खाणीत सापडला होता. ही खाण जगातील सर्वात जुनी हिरे खाण म्हणून ओळखली जाते.[nextpage title=”५)परफेक्ट पिंक”]
१४.२३ कॅरेट वजनाचा हा हिरा ख्रिस्टीजनेच हाँगकाँग येथील लिलावात २३ दशलक्ष डॉलर्सना विकला. त्याचा ग्राहक अज्ञात आहे. मात्र खिस्टीच्या २४४ वर्षांच्या लिलाव इतिहासात लिलावात एवढ्या किमतीला गुलाबी हिरा विकला जाण्याचे हे रेकॉर्ड आहे.खिस्टीजने या काळात पिंक कलरचे १० कॅरेटपेक्षा अधिक वजनाचे १८ हिरे विकले आहेत. त्यात या हिर्याला सर्वाधिक किंमत मिळाली आहे.[nextpage title=”६)विटल्सचबॅच ग्राफट डायमंड”]
हा हिरा म्हणजे एक आख्यायिका आहे. ३१.०६ कॅरेटच्या या हिर्याला रॉयल इतिहास आहे. १७ व्या शतकापर्यंत तो स्पॅनिश राजा फिलिफ चारच्या मालकीचा होता. तो त्याने मुलीला विवाहात हुंडा म्हणून दिला. या हिर्यांला ऑस्ट्रेलिया आणि बेवेरिया राजघराण्याच्या मुकुटात स्थान मिळाले. २००८ साली तो लॉरेन्स ग्राफ या इंग्लीश ज्युवेलरने ख्रिस्टीच्या लंडन येथील लिलावात २४.३ दशलक्ष डॉलर्सना खरेदी केला होता.[nextpage title=”७)स्टेनमेट्झ पिंक”]
हा जगातील एकमेव फायनेस्ट पिंक हिरा थोड्या काळासाठी सुपर मॉडेल हेलेना ख्रिस्टेन्सन हिच्या नेकलेस मध्ये दिसला होता. दक्षिण अफ्रिकेच्या खाणीत तो सापडला. त्याचे वजन आहे ५९.६० कॅरट. गुलाबी हिरे मुळातच मोठ्या आकारात मिळत नाहीत. त्यामुळे हा दुर्मिळ आहे. या हिर्याच्या कटींगचे काम तज्ञाच्या देखरेखीखाली २० महिने सुरू होते. त्यातून हा ओव्हल शेपचा मिक्स कट हिरा निर्माण झाला. स्टेनमेट्झ ग्रुप ने हा हिरा २५ दशलक्ष डॉलर्सना विकला.[nextpage title=”८)प्रिन्सी डायमंड”]
फॅन्सी इंटेन्स पिंक कलरचा ३४.६५ कॅरट वजनाचा हा हिरा फारच दुर्मिळ समजला जातो. भारतातील गोलकोंडा खाणीत हा हिरा मिळाला व त्यावर हैद्राबादच्या निजामाची मालकी होती. त्यांनी हा हिरा १९६० साली लंडन ब्रँच व्हॅन ल्फि व अर्पेल्सला विकला.त्याची किंमत आहे ४० दशलक्ष डॉलर्स. त्याचे नांव बडोद्याच्या १४ वर्षाच्या राजकुमारावरून दिले गेलेले आहे.[nextpage title=”९)ग्राफ पिंक”]
२४.७८ कॅरटचा हा हिरा योर्क ज्यूवेलर हॅरी विन्स्टन यांच्या मालकीचा होता व तो ६० वर्षे त्यांच्या खासगी संग्रहात होता. निर्दोष स्वच्छ आणि कोणतीही अशुद्धता नसलेल्या या हिर्याची ४६ दशलक्ष डॉलर्स किंमत आहे.[nextpage title=”१०) होप”]
इतिहासात कुप्रसिद्ध ठरलेला हा गर्द निळा हिरा. असे सांगितले जाते की तो भारतातील एका मूर्तीत जडविला गेला होता आणि तेथून तो चोरला गेला. मात्र ज्यांच्या ताब्यात तो राहिला त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले. इतकेच नव्हे तर या हिर्याला स्पर्श केला तरी मृत्यू येतो अशीही त्याची किर्ती पसरली. या हिर्याची मालकी हेन्री फिलिप होप यांच्याकडे असून त्याची किंमत आहे ३५० दशलक्ष डॉलर्स.[nextpage title=”११)कुलीनन डायमंड”]
पियर शेपमधला हा हिरा ५३०.२० कॅरट वजनाचा होता. स्टार ऑफ आफ्रिका असा सन्मान त्याला मिळाला. कुलीनन डायमंड या नावाने ओळख असलेल्या या हिर्यातून ९ मोठे हिरे कटींग करून काढले गेले. त्यातला हा सर्वात मोठा. १९०५ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्य प्रिमियम माईनमध्ये तो सापडला. खाणमालक कुरिनन याने तो किंग एडवर्ड सातवा याला लॉयल्टीचे प्रतीक म्हणून भेट दिला. त्याचे कटिंग ८ महिने सुरू होते. त्याची किंमत ४०० दशलक्ष डॉलर्स इतकी असून राजमुकुटात तो क्रॉसच्या मध्यात विराजमान आहे.[nextpage title=”१२ )कोहिनूर”]
कोहिनूर या पर्शियन शब्दाचा अर्थ आहे प्रकाशाचा डोंगर. या हिर्याबाबत असे सांगितले जाते की तो ज्याच्या ताब्यात असेल तो जगावर राज्य करतो. १०५ कॅरटचा हा हिरा एकेकाळी जगातील सर्वात मोठा हिरा होता. त्याचा इतिहास ख्रिस्तपूर्व काळात जातो. तो प्रथम दिसला १३०० च्या शकात आणि त्याची पहिली नोंद झाली १५२६ वर्षांपूर्वी. हा मुगल बादशाह बाबर याच्या मालकीचा होता. या हिर्याची किंमत अमूल्य मानली जाते म्हणजेच त्याची किंमतच करता येत नाही. सध्या तो लंडनच्या संग्रहालयात आहे.