६० हजार कोटींची गुंतवणूक करणार एअरटेल

airtel
नवी दिल्ली- भारती एअरटेल उत्तम दर्जाचे नेटवर्क देता यावे म्हणून ६०,००० कोटींची गुंतवणूक करणार असून ही गुंतवणूक पुढील तीन वर्षात केली जाईल असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकल्पाचे नाव प्रोजेक्ट लीप असे असून गुंतवणुकीतील मोठा भाग हा आवाज आणि नेटवर्कची गुणवत्ता सुधारण्यासाठी खर्च होणार आहे असे भारती एअरटेलचे मुख्याधिकारी गोपाल विठ्ठल यांनी सांगितले. देशभरात ७०,००० बेस स्टेशन तयार करण्यात येणार असल्याचे एअरटेलने सांगितले.

Leave a Comment