‘मॅगी’ चे देशातील सर्व प्रकल्प कार्यान्वित

maggi
नवी दिल्ली : पोटाची भूक दोन मिनिटात शमवणा-या लोकप्रिय इन्स्टंट नूडल मॅगीचे देशातील सर्व पाच प्रकल्पांमधून उत्पादन सुरु केल्याची माहिती नेस्ले इंडियाने दिली.

जून महिन्यात काही राज्यांमध्ये मॅगीवर मॅगीमध्ये शरीराला घातक ठरणा-या घटकांचे प्रमाण जास्त आढळल्यामुळे बंदी घालण्यात आली होती. सर्व सुरक्षा चाचण्यांमध्ये मॅगी उर्तीण झाल्यानंतर नऊ नोव्हेंबरपासून नव्याने मॅगीचे उत्पादन सुरु झाले होते. ननजागड (कर्नाटक), मोगा (पंजाब), बिचोलिम (गोवा), ताहलिवाल, पंतनगर (हिमाचलप्रदेश) या सर्व पाच प्रकल्पांमधून मॅगीचे उत्पादन सुरु झाल्याची माहिती नेस्ले इंडियाने दिली आहे. नेस्ले इंडियाने मागच्या आठवडयात उत्तराखंडच्या पंतनगर प्रकल्पातून मॅगीचे उत्पादन सुरु केले होते. मॅगीमध्ये काही घटक ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यामुळे जून महिन्यात मॅगीवर बंदी घालण्यात आली होती. यामुळे नेस्लेला ३० हजार टन मॅगी नष्ट करावी लागली. मॅगीचे या काळात एकूण ४५० कोटींचे नुकसान झाले.

यानंतर विविध चाचण्यांचे अहवाल आल्यावर न्यायालयाकडून बंदी उठविण्यात आली होती. सरकारने अधिकृत केलेल्या प्रयोगशाळांमधून मॅगीचे नमुने तपासण्यात आले असून, ते खाण्यासाठी १०० टक्के सुरक्षित असल्याचा अहवाल दिला. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये मॅगीचे उत्पादन पुन्हा सुरू करण्यात आले आहे. कंपनीच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील आणि परदेशातील अधिकृत प्रयोगशाळांमध्ये मॅगीच्या २० कोटी नुमन्यांची चाचणी करण्यात आली. सर्व नमुन्यांचे अहवाल सकारात्मक आले आहे. त्यामुळे आता मॅगीच्या देशातील सर्व प्रकल्पांमध्ये उत्पादन सुरू करण्यात आले आहे. असे नेस्ले कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment