पतंजली आयुर्वेद ऑनलाईन विक्रीत उतरणार

patanjali
हरद्वार – योगगुरू रामदेवबाबांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने व्यवसाय विस्ताराची योजना हाती घेतली असून कंपनी आता ऑनलाईवरही त्यांच्या उत्पादनांची विक्री करणार आहे. मात्र ही विक्री स्वतःची ईकॉमर्स कंपनी स्थापून करणार वा अन्य ई कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून करणार हे स्पष्ट केले गेलेले नाही. मात्र व्यवसाय विस्तारासाठी १ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

दक्षिण भारतातील फूड पार्कमध्ये भागीदारीचा कंपनीचा विचार आहे. रामदेवबाबा यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या पतंजलीची १५ हजार स्टोअर्स आहेत. नवीन विस्तारात डेअरी, इन्स्टंट फूड, बालसंगोपन, नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने व पौष्टीक आहार या सध्याच्या उत्पादनांबरोबरच गाय दूध पावडर, चीज व चॉकलेट बनविण्याचा विचार केला जात आहे.तसेच पोष्टीक पशुआहारही बनविला जाणार आहे. कंपनी व्यवसाय विस्तारासाठी करणार असलेल्या १ हजार कोटींच्या गुंतवणुकीपैकी ५०० कोटींचे कर्ज बॅका देणार आहेत. गतवर्षी पतंजलीची व्यवसाय उलाढाल २ हजार कोटींची होती ती पुढील वर्षात पाच हजार कोटींवर जाईल असाही विश्वास रामदेवबाबा यांनी व्यक्त केला.

1 thought on “पतंजली आयुर्वेद ऑनलाईन विक्रीत उतरणार”

Leave a Comment