माणूस थोडासा थकला की कपभर चहा पितो. काही लोकांना चहापेक्षा थंड पेय जास्त योग्य वाटतात म्हणून ते लोक थकवा आला की, काही तरी तुफानी करूया असे म्हणत थंड पेयाची बाटली रिचवतात. कपभर चहा किंवा थंड पेयाची बाटली घशाखाली गेली की हे लोक ताजेतवाने होतात. त्यातच पुन्हा डॉक्टर लोकांनी अलीकडच्या काळात एनर्जी ड्रिंक्स नावाचा नवा प्रकार रूढ केला आहे. काही कारणाने डीहायड्रेशन होऊन रूग्णाला थकवा यायला लागला की डॉक्टर मंडळी त्याला एनर्जी ड्रिंक्स पिण्याचा आग्रह धरतात आणि त्याने त्याच्या अंगात एनर्जी येते असे पेशंटलाही वाटायला लागते.
साखरेतच खरी ऊर्जा
मात्र आता संशोधकांना असे आढळून आले आहे की एक कपभर चहा, कोल्ड ड्रिंक किंवा एनर्जी ड्रिंक यात काही वेगवेगळे घटक असले तरी सर्वांमध्ये एक सामान्य गोष्ट असते. ती म्हणजे साखर. मग आता पेशंटला तरतरी येते ती त्या पेयातल्या काही घटकांमुळे येते की निव्वळ साखरेमुळे येते याचा काही पत्ता लागत नाही. मात्र शास्त्रज्ञांनी असे दाखवून दिले आहे की ही तरतरी त्या पेयांमधल्या साखरेमुळे येत असते.
या निष्कर्षामुळे डॉक्टर मंडळी आता सांगत आहेत की थकल्यासारखे वाटत असेल चहा, थंड पेये, एनर्जी ड्रिंक्स पिण्यापेक्षा एक चमचाभर साखर खा. एक चमचाभर साखर एक ग्लासामध्ये विरघळून ते पाणी प्राशन केले तरी माणूस ताजातवाना होऊ शकतो. तेव्हा आता या नव्या संशोधनामुळे थंड पेय आणि एनर्जी ड्रिंक्स यांच्या उत्पादनामध्ये चिंता व्यक्त व्हायला लागली आहे.
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही