देशातील विमानतळांवर बीएसएनएल पुरविणार वाय-फाय सेवा !

bsnl
नवी दिल्ली – भारतीय विमानतळ प्राधिकरण द्वारा संचालित विमानतळांवर वाय-फाय सेवा पुरविण्यावर विचार सरकारी दुरसंचार सेवा कंपनी बीएसएनएल करत आहे. बीएसएनएलचे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले की विमानतळांवर वाय-फाय सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही तीन महिन्यांपूर्वी एएआय अध्यक्षांशी संपर्क केला होता. त्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एएआयने बीएसएनएल सेवेसाठी मंजुरी दिली आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून संचालित देशातील सर्व विमानतळांवर बीएसएनएल सेवा सुरू करण्यास परवानगी देण्याची सूचना देण्यात आली आहे. एएआय ११ अंतरराष्ट्रीय विमानतळांबरोबरच देशातील १२१ विमानतळांचे व्यवस्थापन करते.

Leave a Comment