चेन्नई, अहमदाबाद मेट्रोसाठी जपान देणार कर्ज

दिल्ली –metro चेन्नई आणि अहमदाबाद येथील मेट्रो प्रकल्पांसाठी जपान भारताला ५५३६ कोटी रूपयांचे कर्ज देणार असून त्या संदर्भातल्या करारांचे आदानप्रदान नुकतेच केले गेले आहे. अर्थविभागाचे संयुक्त सचिव एस. सेलवकुमार व भारतातील जपानच्या दुतावासातील युताका किकुता यांच्यात या करारांचे आदानप्रदान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चेन्नई मेट्रोसाठी १०८० कोटी तर अहमदाबाद मेट्रोसाठी ४४५६ कोटी रूपयांचे कर्ज जपान या करारानुसार देणार आहे. १९५८ सालापासून भारत व जपान यांच्यात एकमेकांसाठी आर्थिक सहयोग केला जात आहे.

Leave a Comment