पिझ्झाबरोबर बांधली लग्नगाठ

pizza
मास्कोतील एका पिझ्झा वेड्याने आपली लग्नगाठ चक्क पिझ्झाबरोबरच बांधली आहे. त्यामागचे त्याचे लॉजिकही भन्नाटच आहे. तो म्हणतो, कोणत्याही स्त्रीशी लग्न करणार नाही हा माझा निश्चय आहे. कारण लोक लग्न करतात आणि त्यांच्यात सतत वादविवाद होत राहतात. एकमेकांविरूद्ध सतत तक्रारी सुरू होतात. दोन माणसांतले प्रेम हे फारच जटील आणि निभावायला अवघड असलेले कोङे असते.

त्यापेक्षा पिझ्झा बरा. एकतर मला पिझ्झा प्रचंड आवडतो त्यामुळे त्याविषयी नेहमीच प्रेम वाटते. मला तो सतत डोळ्यासमोर हवा असतो. त्याच्याबरोबरचा माझा संसार नक्कीच सुखाचा होणार. या लग्नात पिझ्झालाही पारंपारिक वेडींग गाऊन घालून सजविले गेले होते असेही समजते.