भारतात आला ‘क्विक्यू’चा पहिला स्मार्टफोन

qui-tera
नवी दिल्ली – कमी किंमतीच्या आणि चांगले फिचर्स देणा-या स्मार्टफोनची मोबाईलच्या विश्वात सतत स्पर्धा सुरू असते. आता या स्पर्धेमध्ये ‘क्विक्यू’ या मोबाईल कंपनीने देखील उडी घेतली आहे. आपला पहिला वहिला स्मार्टफोन या कंपनीने भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनचे नाव ‘क्विक्यू क्यू टेरा’ असे असून याची किमत १९ हजार ९९९ एवढी आहे.

क्विक्यू ही एक चीनची कंपनी असून या कंपनीने भारतीय मोबाईल विश्वात आपल्या ‘क्यू टेरा’ या स्मार्टफोनच्या माध्यमातून प्रवेश केला आहे. हा स्मार्टफोन येत्या पाच डिसेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये रेअर आणि फ्रंट कॅमेरा १३ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे.

‘क्विक्यू क्यू टेरा’ चे फिचर्स – » सहा इंच डिस्प्ले » ५.१ अँड्रॉईड लॉलिपॉप » १०८० x १९२० पिक्सल रेझोल्यूशन » दोन गिगाहर्टझ कॉलाकोम हेक्सा-कोर प्रोसेसर » तीन जीबी रॅम » १३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा » १३ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा » १६ जीबीची इंटरनल मेमरी » ३७०० एमएएच बॅटरी » किंमत १९ हजार ९९९ रुपये.

Leave a Comment