अवघ्या ३०० रुपयात कॉम्प्युटर

rasperry-pi
मुंबई : तुम्ही आजवर अनेक कॉम्प्युटर पाहिले असतील पण आता मात्र कधी न विचार केलेला कॉम्प्युटर ३०० रुपयांना मिळणार आहे. कारण सर्वात स्वस्त कॉम्प्युटर मिनी कॉम्प्युटर तयार करणारी कंपनी ‘रास्पबेरी पाय’ने लॉन्च केला आहे.

रास्पबेरी पाय झिरो नावाच्या या कॉम्प्युटरची किंमत ५ डॉलर म्हणजे फक्त ३०० रुपये आहे . ६५x३०x५ मिमी डायमेन्शन असलेला हा कॉम्प्युटर सर्वात स्वस्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

काय आहेत ‘रास्पबेरी पाय झिरो’चे फीचर्स : यात ब्रॉडकॉम बीसीएम २८३५ अॅप्लिकेशन प्रोसेसर दिला असून रॅम २१५ एमबी आहेत. मायक्रो एसडी कार्डचा स्लॉट स्टोरेजसाठी देण्यात आला आहे. ऑपरेटिंग सिस्टम लायनेक्सवर आधारित रास्पबियन आहे. यात मिनी एचडीएमआय सॉकेट दिला आहे. कम्पोजिटिव्ह व्हिडीओ हेडर देखील आहे. यामध्ये स्टँडर्ड यूएसबी पोर्ट देण्यात न आल्यामुळे डिव्हाईस कनेक्टिव्हिटीसाठी अतिरिक्त यूएसबी पोर्ट जोडावी लागणार आहे. सध्या हा कॉम्प्युटर ब्रिटन आणि अमेरिका या देशांमध्ये उपलब्ध करण्यात आला असून भारतात कधी लॉन्च केला जाणार, याबाबत काहीही माहिती देण्यात आली नाही.

Leave a Comment