नवी दिल्ली- डॉलरची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारात वाढल्याने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २४ पैशांनी मुद्रा बाजारात घसरला. दोन वर्षात अत्यंत खालच्या स्तरावर रुपया घसरला आहे. अन्न-धान्यासह अनेक वस्तू रुपयाच्या अवमुल्यनामुळे महागण्याची शक्यता आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया दोन वर्षाच्या नीचांक पातळीवर
शुक्रवारी बाजार उघडताच अवघ्या अर्धा तासात भारतीय रुपया डॉलरच्या तुलने ६६.८८ वर घसरला. रुपया २३ सप्टेंबर, २०१३ रोजी नीचांक पातळीवर पोहोचला होता. रुपया घसरण्याला अमेरिकन डॉलर इंडेक्समध्ये आलेली तेजी कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. भारतात गरजेच्या ८० टक्के पेट्रोलियम पदार्थ आयात केले जाते. रुपयाची घसरणीमुळे आयात महाग होईल आणि त्यामुळे देशांतर्गत पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. अचानक महागाईही वाढू शकते. त्यामुळे सामन्य जनतेला आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.