कुख्यात महिला कैदी अवतरल्या रॅम्पवर

beauty1
ब्राझील – तुम्ही आतापर्यंत अनेक सौंदर्य स्पर्धांबद्दल ऐकले असेल अथवा वाचले असेल. मात्र तुम्हाला एका अनोख्या सौंदर्य स्पर्धेबद्दल आज आम्ही सांगणार आहोत. जे वाचून तुम्ही थक्क व्हाल. आता आम्ही तुम्हाला अशा एका सौंदर्य स्पर्धेविषयी सांगणार आहोत जे तुम्ही कधीही वाचले नसेल. होय, ही सौंदर्य स्पर्धा आहे महिला कैद्यांची.

beauty2

या विशेष स्पर्धेचे आयोजन ब्राझिलमधील तलावेरा ब्रूस तुरुंगात करण्यात आले होते. अनेक कुख्यात महिला कैद्यांनी या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे आयोजन कैद्यांनी गमावलेला आत्मविश्वास परत मिळावा या उद्देशाने करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये महिला कैद्यांच्या मेकअप व हेअरस्टाइल्ससाठी वॉलेन्टियर्सची मदत घेण्यात आली होती. यावळी अनेक महिला कैदी मॉडेल्सप्रमाणे रॅम्पवर कॅटवॉक करताना दिसल्या. इतकेच नव्हे तर त्यांनी वेगवेगळ्या पोझही दिल्या.