आयआरसीटीसीने वर्षभरात जमविला २० हजार कोटींचा गल्ला

irctc
मुंबई : आपल्या आयआरसीटीसीच्या वेबसाईटद्वारे भारतीय रेल्वेने यंदा रग्गड कमाई केली असून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून प्रवाशांनी बुक केलेल्या तिकिटांमुळे रेल्वेने तब्बल २० हजार कोटींहून अधिक रुपयांचा महसूल जमवला आहे. मार्च २०१५ पर्यंतचा आयआरसीटीसीच्या कमाईचा हा आकडा आहे.

आयआरसीटीसीने मार्च २०१५ अखेर तिकीट विक्रीद्वारे तब्बल २० हजार ६२० कोटी रुपयांची कमाई केली असून ऑनलाईन शॉपिंग क्षेत्रातील बलाढ्य कंपनी ‘फ्लिपकार्ट’च्या कमाईपेक्षाही ही कमाई दुप्पट आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत आयआरसीटीसीने यंदा ३४ टक्के अधिक गल्ला जमवला आहे. आयआरसीटीसीला तिकीटविक्रीतून गेल्या वर्षी मार्चअखेर १५ हजार ४१० रुपये मिळाले होते.

प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुक करताना अडचणी येऊ नयेत म्हणून आयआरसीटीसीने अद्ययावत यंत्रणा सुरू केल्या आहेत. गेल्या वर्षी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर प्रत्येक मिनिटाला २ हजार तिकीट बुक करता येत होते. मात्र ही प्रणाली यंदा अद्ययावत केल्यामुळे आता प्रती मिनिटाला तब्बल ७ हजार प्रवासी तिकीट बुक करू शकतात. यामुळेच आयआरसीटीसीने मोठ्या प्रमाणात तिकीटविक्रीतून गल्ला जमवल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment