लोम्बार्गिनीची प्रॅक्टीकल कार सादर

lomar
लॉस एंजेलिस येथील इंटरनॅशनल ऑटो शो मध्ये लोंबार्गिनीने त्यांचे नवे मॉडेल एलपी ५८० -२ सादर केले आहे. ५८० हॉर्सपॉवरचे इंजिन असलेली ही कार चालविण्यासाठी प्रॅक्टीकल आहे असा कंपनीचा दावा आहे. लोंबार्गिनीच्या अन्य कारपेक्षा ही भारीभक्कम कार निश्चितच वेगळी आहे.

नेहमी भारी भक्कम कार फोर व्हील ड्राईव्हच्या असतात मात्र एलपी ५८०-२ कारमध्ये सारा भार मागच्या दोन चाकांवर दिला गेला आहे. परिणामी ती वजनाला हलकी झाली आहे व त्यामुळेच तिच्यावर नियंत्रण करणे चालकाला सुलभ झाले आहे. ० ते १०० किमीचा वेग ही गाडी ३.४ सेकंदात घेते. कंपनीचे सीईओ स्टीफन विकेलमन म्हणाले, सिरीयस चालकांसाठी ही सिरीयस कार आहे. तिचे रूपडे आकर्षक आहे. आणि ती चालविताना चालकाला पूर्ण समाधान आणि आनंद मिळेल. अमेरिकी बाजारात ही कार लवकरच दाखल होत असून तिची किंमत आहे १,९९,८०० डॉलर्स म्हणजे १ कोटी २५ लाख रूपये.

Leave a Comment