जगातील प्राचीन वैभवशाली शहरे

[nextpage title=”जगातील प्राचीन वैभवशाली शहरे”]
collarge
आजच्या आधुनिक काळात श्रीमंत किवा वैभवशाली शहरे म्हणजे जेथे गगनचुंबी इमारतींची रेलचेल आहे, मोठमोठे उद्योग आहेत, चांगल्या पायाभूत सुविधा आहेत आणि जेथे आधुनिक तंत्रज्ञान आणि त्यासहाय्याने चालणार्‍यंत्रणा मोठया प्रमाणावर आहेत ती शहरे अशी ओळख आहे. पण जेव्हा तंत्रज्ञान फारसे प्रगत नव्हते आणि बांधकाम साधनेही अतिशय मर्यादित होती, जेव्हाही जगात बरीच मोठी नगरे श्रीमंत, वैभवशाली म्हणून प्रसिद्धी पावलेली होती. ही शहरे सांस्कृतिक वारसा सांगणारी, आरामदायी जीवन असलेली होती आणि तरीही ती अतिशय संपन्न होती. अशाच कांही शहरांची म्हणजे त्या काळातील नगरांची ओळख करून देत आहोत.

१)एल डोरॅडो
1-El-Dorado
मध्य किवा दक्षिण अमेरिकेचे संपूर्ण ज्ञान मिळविण्यासाठी जेव्हा जोरदार शोध केले जात होते तेव्हापासून या शहरासंबंधीची माहिती लोकांना होती. त्याकाळी त्या अफवा आहेत असेही म्हटले जात असले तरी या नगराचा शोध घेण्याचे काम सुरूच होते. स्पॅनिश आक्रमक त्यात आघाडीवर होते कारण ही सुवर्णनगरी म्हणून परिचित होती. अशी वदंता होती की या सुवर्णनगरीत केवळ इमारतीच नाही तर रस्तेही सोन्याचे होते. एल डोरॅडो या शब्दाचा अर्थच मुळी गोल्डन वन असा आहे. या नगराविषयी संशोधकांचे मत असे आहे की सध्याचे कोलंबिया म्हणजेच हे शहर असावे.येथील लोक धातूकामात अतिशय कुशल होते आणि तेथे सोन्याचा पुरवठाही प्रचंड प्रमाणात होत होता. विनिमयासाठी येथे सोन्याचाच वापर केला जात असे. कुशल कलाकार सोन्याच्या विविध वस्तू घडवून देवतांना अर्पण करत आणि या नगरातील अगदी सर्वसामान्य नागरिकाकडेही मुबलक सोने असे. त्याचाच लोभ स्पॅनिशांना पडला असावा.[nextpage title=”२) कुझको”]

2-Cuzco
इंका साम्राज्याची राजधानी असलेले हे शहर इंका येण्यापूर्वीपासूनच अस्तित्वात होते. येथील बलाढ्य किल्ला इंका लोकांनी काबीज केला आणि या शहराला आपली राजधानी बनविले. आजही येथे ऐतिहासिक महत्त्वाच्या अनेक वास्तूंचे अवशेष, विविध युगांच्या खुणा पाहायला मिळतात. त्याकाळातही येथे तंत्रज्ञान चांगले प्रगत होते. येथील मंदिरे, पाणरस्ते, आधुनिक योजनाबद्ध शहरांची आठवण करून देतात. त्याकाळी हे नगर भरभराटीस आलेले आणि महत्त्वाचे मध्यवर्ती स्थान होते आजही येथे कलाकुसरीचे अप्रतिम देखणे नमुने येथील कलाकारांच्या बौद्धिक संपदेची साक्ष देतात.[nextpage title=”३)टनॉचटिनलन”]

3-Tenochtitlan
जुन्या मेक्सिका लोकांचे हे संपन्न शहर १३२५ साली सापडले आहे. मेस्किकोतील या संपन्न प्राचीन शहराचे नियोजन अतिशय काळजीपूर्वक केले गेले होते तेही तंत्रज्ञानाची फारशी प्रगती झालेली नसताना. हे नगर पाण्यावर बांधलेले आहे, पाण्यात मातीची भर टाकून बेटे केली गेली आणि त्यावर ही उभारणी झाली. संपूण नगरी कालव्यांनी जोडलेली असली तरी येथे पायी आणि बोटीने फिरता येत असे. टोलेजंग दगडी इमारती, स्वच्छ पाणीपुरवठ्याची सुविधा त्याकाळीही येथे होती. येथील नागरिक दिवसातून अनेक वेळा स्नान करत असत . मुख्य बाजारात वस्तूंची खरेदी विक्री असे आणि या पाणनगरीत त्याकाळातही अत्यंत विशाल मंदिरे, इमारती, राजवाडे, प्राणीसंग्रहालये होती. त्यातील अनेक वास्तू आजही चांगल्या स्थितीत आहेत. स्ॅपनिश आक्रमक कार्तेस याचे आगमन होण्यापूर्वी या शहराची लोकसंख्या ३ लाख होती असेही संदर्भ सापडतात.[nextpage title=”४)ग्रेट झिबाब्वे”]

4-Great-Zimbabwe
झिबाब्बे साम्राज्याच्या राजधानीचे हे नगर. लोह युगातील व्यापाराचे सधन समृद्ध केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. चीन पर्यंत येथून व्यापारी मार्ग होते. येथे प्रामुख्याने सोन्याच्या खाणी होत्या व व्यापाराचा मुख्य आधार हे सोनेच होते. येथील रॉयल पॅलेस उंच तटबंदी असलेला होता. आज ग्रॅनाईटसाठी हे नगर प्रसिद्ध आहे.१४५० साली येथील खाणीतील सोने संपुष्टात आले व त्या नंतर ते उजाड होण्याच्या मार्गावर गेले. तरी आजही येथे प्राचीन संपन्नतेच्या उद्धस्त खुणा आढळतात.[nextpage title=”५)दमास्कस”]

5-Damascus
जगातले वस्ती असलेले सर्वात जुन्या शहरातील एक अशी याची ओळख. हे नगर श्रीमंत शहरात मोडत असे कारण येथे व्यापार प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असे. अनेक महत्त्वाचे व्यापारी मार्ग येथून जात असत. रोमन्स पासून ऑटोमन तुर्की पर्यंत येथे अनेकांची सत्ता होती. प्राचीन काळची उमाय्यद मशीद ही जुनी इस्लामी मशीद आजही पाहायला मिळते. त्याच्याभोवतीच चौक, बाजाराचा पसारा होता.[nextpage title=”६)शिआँ”]

6-Xi’an
चीनच्या शान्झी प्रांताची ही राजधानी ३१०० वर्षांचे जुने नगर म्हणून प्रसिद्ध आहे. चीनच्या चार मुख्य राजधान्यांपैकी ही एक. संपत्ती, श्रीमंती आणि सत्ता यांचे वैभव दाखविणारी. सिल्क रोड या जगप्रसिद्ध व्यापारी मार्गाची सुरवात येथूनच झाली. आज हे नगर प्रामुख्याने प्रसिद्ध आहे ते जगप्रसिद्ध टेराकोटा आर्मीसाठी. जमिनीखाली लपलेले हे वैभव अलिकडेच खणून वर काढले गेले आहे. येथे जतन केलेल्या पुरातन भिंती, मंदिरांचे, इमारतींचे अवशेष या नगराची संपत्ती अधोरेखित करण्यासाठी पुरेसे आहेत.[nextpage title=”७)काहोकिया”]

7-Cahokia
प्री कोलंबियन नेटिव्ह असलेली ही अमेरिकन नगरी मिसीसीपी नदीजवळ वसलेली असून ती आज सेंट लुईस मिसुरी म्हणून ओळखली जाते. जुन्या काळचे हे मोठे आणि महत्त्वपूर्ण नगर अर्थात त्याची माहिती आज फारच थोड्यांना आहे. युरोपियनांचा संबंध येण्यापूवी ५०० वर्षे येथे स्थनिक अमेरिकन वस्ती करून होते. व्यापारी मार्गामुळे हे नगर श्रीमंत व संपन्न झाले. आजही येथे प्राचीन भांडी,लाकूड, तांबे, दगड आणि हे त्याकाळातले महत्त्वाचे कृषी केंद्र असल्याचे पुरावे उत्खननात मिळत आहेत.[nextpage title=”८) प्लॉवडिव्ह”]

8-Plovdiv
बल्गेरियातील ६ हजार वर्षांपूर्वीचे हे शहर रोमन साम्राज्याचा महत्त्वाचा भाग होते. रोमन लेखक ल्युसियन याने हे जगातील सर्वात मोठे, सुंदर शहर असल्याचे नमूद केले आहे. आजही येथे अनेक प्राचीन अवशेष दिसतात. त्यात भल्या मोठ्या सार्वजनिक इमारती, समाधीस्थळे, सार्वजनिक हमामखाने, थिएटर्स यांचा समावेश आहे. त्याकाळातही येथली पाणीपुरवठा पद्धत सुधारित होते व ड्रेनेजची व्यवस्था होती. त्यासासाठी डबल भिंतीचे संरक्षण होते. जुन्या कलात्मक वस्तू आणि वास्तू हा आज येथला सर्वात मोठा खजिना आहे.[nextpage title=”९)बॅबिलॉन”]

9-Babylon
प्रबळ सत्ताकेंद्र म्हणून ओळख असलेली ही नगरी त्याकाळातही पुढारलेली आणि संपन्न नगरी होती. किंग झारच्या काळातली ही नगरी विटांच्या प्रचंड भिती असलेले ४५० फूट उंचीचे व रूंद २५० मनोरे यांनी संरक्षित होती. रस्ते बांधलेले होते त्याना जागोजागी ब्रास धातूची फाटके होती. युफ्राटिस नदी या शहरातून वाहत असे आणि तिचेच पाणी वापरात आणले जात होते. फेरीबोटी, पूल वाहतुक सुरळित ठेवत असत तर काल्पनिक हँगिग गार्डन याच नगरीत होते. येथे सोन्याच्या कलाकुसरीच्या वस्तू, दागिने मुबलक प्रमाणात बनविले गेले होते. त्यातील एक टेबल तर ५० हजार पौंड वजनाच्या सोन्यापासून बनविले गेले होते. इथला राजप्रासाद तर त्याकाळात जगातील सर्वात मोठा राजप्रासाद होता असेही सांगितले जाते. सोन्याचा सिंह आणि मानवी पुतळा ही मुख्य आकर्षणे होती.[nextpage title=”१०) अथेन्स”]

10-athens
पाश्चिमात्य संस्कृतीचा पाया असलेले ७ हजार वर्षे जुने व सतत वस्ती असलेले हे शहर इतिहासातील महत्त्वाचे ठाणे आहे. याला केवळ ऐतिहासिक महत्त्व आहे असे नाही तर ही नगरी फिलॉसॉफी , शिक्षण, धर्म व अन्य बाबींसाठीही मोठे योगदान देणारी म्हणून ओळखली जाते. येथील इमारती सत्ता आणि संपत्तीची साक्ष देणार्‍या आहेत. अगोरा सारखी प्रचंड मोठी सार्वजनिक इमारत, अॅक्रोपोलिस, बॅनझाँटशईन चर्चेस आजही त्याची साक्ष देतात. येथे त्याकाळातही लोकशाही रूजली होती, बहरली होती. हजारो वर्षे येथील सांस्कृतिक जीवन विविधांगानी संपन्न होत आले आहे.[nextpage title=”११) रोम”]

11-rome
संपत्ती, कला, संस्कृती आणि राजकारणाचे महत्त्वाचे केंद्र असलेले रोम पाश्चिमात्य सिव्हीलायझेशनचे जन्मस्थान म्हणून आजही प्रसिद्ध आहे. नजरबंदी करणारी सुंदर वास्तूशिल्पे, कलात्मक वस्तू, देखणे पुतळे यांची एकच दाटी या शहरात आहे. भग्नावस्थेत असले तरी अवाढव्यतेची साक्ष देणारे कलोझियम, संगमरवरात कोरलेली शिल्पे, पुतळे, चर्च घुमट शेकडो वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनात अचंबा निर्माण करण्यात सक्षम आहेत. दुकाने, बाजार त्यावेळीही मोठाच होता आणि त्याकाळातही येथे पुस्तकांची मोठी बाजारपेठ होती. त्याचबरोबर अनेक प्रकारची पादत्राणे, मसाले यांचीही दुकाने होती. येथील नागरिकांचे आयुष्य आनंदी आणि समाधानी होते. आजही रोम पर्यटकांसाठी फार महत्त्वाचे केंद्र आहे.[nextpage title=”१२) कॉन्स्टॅनटिनोपल”]

12-Constantinople
कॉन्टेस्टाईन सम्राटाची ही सुंदर व श्रीमंत राजधानी हजारो वर्षांपासून आपला दबदबा राखून आहे. तंत्र, कला व संस्कृतीचे माहेरघर म्हणूनही त्याची ओळख. त्या काळातही रूंद रस्ते, लॉ कोर्ट, सिनेट इमारत यांनी परिपूर्ण असलेल्या या शहराला संरक्षक भितींची तटबंदी होती. त्यातील प्रचंड गोल्डन गेट मुख्य आकर्षण . १२ व्या शतकात हे शहर मोझॅक आर्ट व सिल्कमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर होते. येथील सर्वसामान्य नागरिकही महागड्या वस्तू सहज खरेदी करत असत. आजच्या व्हेनिसवर या शहराचा खूपच प्रभाव आहे.

Leave a Comment